शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

हृदयद्रावक! बागेश्वर धामच्या बाबा धीरेंद्र शास्त्रींच्या दरबारात दीड वर्षीय मुलीचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2023 12:03 IST

बाबांच्या धाममध्ये दीड वर्षाच्या निष्पाप मुलीचा मृत्यू झाल्याच्या घटनेने सर्वांनाच धक्का बसला आहे.

बाबा धीरेंद्र शास्त्री यांच्या बागेश्वर धाममधून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. जबलपूर येथील बाबांच्या धाममध्ये दीड वर्षाच्या निष्पाप मुलीचा मृत्यू झाल्याच्या घटनेने सर्वांनाच धक्का बसला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बागेश्वर धाममध्ये सुरू असलेल्या भागवत पंडालमध्ये ही घटना घडली आहे. गुदमरल्यामुळे मुलाचा मृत्यू झाल्याचं म्हटलं जात आहे. अति उष्णतेमुळे आणि श्वास घेण्यासाठी हवा नसल्याने जीव गमवावा लागला. या प्रकरणाची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. 

सध्या पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत असल्याचे सांगण्यात येत आहे. बाबा धीरेंद्र शास्त्री यांच्या बागेश्वर धाममध्ये भागवत पंडाल लावण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. या पंडालमध्ये भागवतांची कथा होत होती. ही कथा ऐकण्यासाठी मोठ्या संख्येने लोक तेथे पोहोचले होते. बाबा धीरेंद्र शास्त्री यांचे दर्शन घेण्यासाठी आणि त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी भाविकांचीही गर्दी झाली होती. उष्णता आणि गर्दीमुळे एका लहान मुलीला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. 

मुलीची प्रकृती खालावल्यानंतर तिला तातडीने जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, रुग्णालयातील डॉक्टरांनी मुलीला पाहताच तिला मृत घोषित केले. रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच मुलीचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. मुलीच्या मृत्यूने कुटुंबीयांना धक्का बसला आहे. रडून रडून आई बाबांची अवस्था वाईट झाली आहे. या घटनेनंतर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. 

मुलीच्या मृत्यूनंतर हा कार्यक्रम बंद करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. बागेश्वर धाममध्ये मृत्यूची ही पहिलीच घटना नाही. याआधीही बागेश्वर धाममध्येच एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली होती. ही महिला फिरोजाबाद येथील रहिवासी असल्याचे सांगण्यात आले. या महिलेने महिनाभर बागेश्वर धाम येथे मुक्काम केल्याचे सांगण्यात येत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

 सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"