बादशाहला विदेशात जाण्याची परवानगी
By admin | Updated: August 28, 2015 23:37 IST
बादशाहला विदेशात जाण्याची
बादशाहला विदेशात जाण्याची परवानगी
बादशाहला विदेशात जाण्याचीन्यायालयाची परवानगीनागपूर : वादग्रस्त रॅप गायक आदित्य सिंग ऊर्फ बादशाह याला अतिरिक्त सत्र न्यायाधीश एम. सलमान आझमी यांच्या न्यायालयाने त्याचे दोन्ही अर्ज मंजूर करून त्याला दुबई, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझिलँड येथे जाण्याची परवानगी दिली आहे. ३१ ऑगस्ट ते ५ सप्टेंबर २०१५ पर्यंत दुबई तसेच ९ सप्टेंबर ते २१ सप्टेंबर २०१५ पर्यंत ऑस्ट्रेलिया आणि न्यूझिलँड येथे जाण्याची परवानगी त्याला देण्यात आली आहे. या तिन्ही देशांमध्ये त्याच्या गाण्याचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. अश्लील गाणी गायल्या प्रकरणी बादशाहविरुद्ध पाचपावली पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. तो अटकपूर्व जामिनावर आहे. न्यायालयाच्या परवानगीशिवाय विदेशात जाता येणार नाही, अशी अट त्याच्या जामीन आदेशात असल्याने त्याला ही परवानगी घेणे आवश्यक झाले आहे. विशिष्ट मुदतीत विदेशातून परतल्यानंतर आरोपी बादशाह याने न्यायालयाला रीतसर सूचना द्यावी, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.