Badrinath Yatra News Update: पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याच्या घटनेनंतर देशभरात खबरदारी घेतली जात आहे. याच पार्श्वभूमीवर बद्रीनाथ धामनेही यात्रेकरूंच्या सुरक्षिततेसाठी आणि यात्रा निर्विघ्न पार पाडण्यासाठी काही नियमांत बदल केले आहेत. हे नियम लागू करण्यात आले असून, आता मंदिर परिसरात भाविकांना व्हिडीओ कॉल करण्यावर आणि फोटो काढण्यावर, व्हिडीओ शूट करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. या नियमाचं उल्लंघन करणाऱ्यांना भाविकांना ५००० रुपये दंड भरावा लागणार आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
जिल्हाधिकारी डॉ. संदीप तिवारी यांनी यात्रेच्या तयारीबद्दल आणि भाविकांच्या व्यवस्थेबद्दल अधिकारी आणि संबंधित लोकांशी चर्चा केली. यात्रेत भाविकांची गैरसोय होऊ नये, त्याचबरोबर त्यांच्या सुरक्षिततेसाठी खबरदारीचे उपाय म्हणून काही नियमांमध्ये बदल करण्यात आले.
कपड्याचेच बुट-चप्पल वापरा
या बैठकीत असा निर्णय घेण्यात आला की, यात्रेकरूंनी बद्रीनाथ धाम परिसरात कपड्यांच्या चप्पला, बूट आणि मोठे सॉक्स वापरावेत. भाविकांना या गोष्टी उपलब्ध करून देण्याचे निर्देश हॉटेलच्या मालकांनाच देण्यात आले आहेत.
वाचा >>अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
त्याचबरोबर साकेत परिसरात बुट-चप्पलांसाठी एक स्टॅण्ड उभारला जाणार आहे, जेणेकरून मंदिर परिसरात त्यांचा ढीग होऊ नये आणि गोंधळ उडले.
हॉटेलमध्ये ऑक्सिजन कन्सेट्रेटरच ठेवावेच लागणार
भाविकांच्या प्रकृतीचा मुद्दा लक्षात घेऊन प्रशासनाने हॉटेल्समध्ये ऑक्सिजन कन्सेट्रेटर ठेवणे अनिवार्य करण्यात आले आहे. त्याचबरोबर १३ भाषांमध्ये आरोग्याची काळजी घेण्याबद्दलची मार्गदर्शिका असलेले क्यूआर कोडही हॉटेल आणि इतर ठिकाणी लावण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
मंदिरात दर्शन घेण्यासाठी यावेळी स्लॉट सिस्टिम लागू करण्यात आली आहे. यात्रेकरूंना वेळेत दर्शन करता यावे म्हणून टोकन दिले जाणार आहेत. या टोकनची तपासणी आयएसबीटी, बीआरओ चौक आणि माणा पास यासह इतर ठिकाणी केली जाणार आहे.
एका कुटुंबातील एकाच व्यक्तीला लावता येणार दुकान
प्रसादाच्या दुकानांसंदर्भातही निर्णय घेण्यात आला आहे. दुकानांची गर्दी टाळण्यासाठी मंदिर प्रशासनाने नियमात बदल केला आहे. आता एका कुटुंबातील एकाच व्यक्तीला प्रसादाचे दुकान लावता येणार आहे. दुकानांची गर्दी टाळण्यासाठी आता त्याच व्यक्तींना परवानगी दिली जाणार आहे, जे मागील २५-३० वर्षांपासून दुकान लावत आहेत.
यात्रेकरूंना ये-जा करण्यात अडथळा निर्माण होऊ नये, यासाठी पांडुकेश्वरमध्ये पोलीस बॅरिकेटिंग केले जाणणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश दिले आहेत की, चमोलीच्या लोकांची तपासणी केली जाऊ नये, त्याचबरोबर हॉटेल्समधील जागांनुसारच यात्रेकरूंना पुढे सोडण्यात यावे.