शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
7
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
8
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
9
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
10
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
11
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
12
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
13
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
14
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
15
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
16
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
17
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
18
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
19
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
20
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
Daily Top 2Weekly Top 5

मृत्यूनंतरही होताहेत हाल! रुग्णवाहिका न मिळाल्याने महिलेने गमावला जीव; 4 महिलांनी नेला मृतदेह

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2022 11:24 IST

वेळेवर रुग्णवाहिका न मिळाल्याने एका महिलेला आपला जीव गमवावा लागला आहे.

नवी दिल्ली - देशातील विविध क्षेत्रांत प्रगती झाली असली तरी आजही अनेक ठिकाणी योग्य सोयीसुविधा पोहोचलेल्या नाहीत. जीवनावश्यक गोष्टींसाठी देखील कित्येक लोकांना संघर्ष करावा लागतो. महत्त्वाच्या गोष्टी उपलब्ध नसल्याने अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. अशीच एक धक्कादायक घटना आता समोर आली आहे मध्य प्रदेशमध्ये आरोग्य विभागाची परिस्थिती किती वाईट आहे हे दाखवणारी घटना घडली आहे. वेळेवर रुग्णवाहिका न मिळाल्याने एका महिलेला आपला जीव गमवावा लागला आहे. 

धक्कादायक बाब म्हणजे मृत्यूनंतर देखील हाल झाले. कारण मृतदेह घेऊन जाण्यासाठी देखील वाहन न मिळाल्याने चार महिलांवर तो मृतदेह घेऊन जाण्याची वेळ आली. मिळालेल्या माहितीनुसार, मध्य प्रदेशच्या रीवा जिल्ह्यामध्ये ही हृदयद्रावक घटना घडली आहे. एका 80 वर्षीय महिला जिवंत असताना रुग्णवाहिका मिळाली नाही आणि नंतर मृत्यू झाल्यावर देखील शववाहिनी उपलब्ध झालं नाही. या घटनेचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये 4 महिला आपल्या खांद्यावर एका वृद्ध महिलेचा मृतदेह घेऊन जात आहेत. 

मध्य प्रदेशच्या रीवा जिल्ह्यातील रायपूर महसुआ गावातील हा व्हिडिओ  आहे. यात शववाहिनी उपलब्ध नसल्याने 4 महिलांनी महिलेचा मृतदेह खांद्यावर उचलून नेला मृतदेह खांद्यावर घेऊन या महिलांना तब्बल 5 किलोमीटर चालावं लागलं आहे.  80 वर्षीय वृद्ध महिलेची तब्येत बिघडल्याने तिला रुग्णालयात नेण्यासाठी कुटुंबीयांनी रुग्णवाहिका बोलावली. अनेक तास प्रतीक्षा करूनही रुग्णवाहिका न आल्याने कुटुंबीयांनी महिलेला खाटेसह उचलून सामुदायिक आरोग्य केंद्रात नेलं. तिथे डॉक्टरांनी महिलेला मृत घोषित केलं. 

कुटुंबीयांचा त्रास कमी झाला नाही, कारण रुग्णवाहिकेनंतर कुटुंबीयांना शववाहिनी मिळाली नाही. अखेर घरातील 4 महिला आणि एका मुलीने मिळून खांद्यावरच वृद्ध महिलेचा मृतदेह उचलून दोन तासात 5 किमी प्रवास केला आणि अखेर आपल्या घरी पोहोचले. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, केवळ रेडक्रॉस जिल्हा मुख्यालयात शववाहिनी दिली जाते. इतर ठिकाणी शववाहिकेची सोय नाही. रुग्णांना केवळ रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्याची जबाबदारी सरकारची आहे. मृत्यूनंतर मृतदेह आपणच व्यवस्था करूनच घेऊन जावा लागत असल्याचं म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेश