शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

सामान्यांना आले बुरे दिन!

By admin | Updated: July 22, 2016 04:29 IST

सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेलेल्या जीवनावश्यक वस्तूंच्या किमती यामुळे सर्वसामान्य मेटाकुटीला आले आहेत.

नवी दिल्ली : गगनाला भिडलेली महागाई आणि सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेलेल्या जीवनावश्यक वस्तूंच्या किमती यामुळे सर्वसामान्य मेटाकुटीला आले आहेत. सांगा, या लोकांनी जगायचं कसं? असा संतप्त सवाल आज काँग्रेसचे खासदार प्रमोद तिवारी यांनी राज्यसभेत केला. तुम्ही अच्छे दिनचे स्वप्न दाखवून सत्तेत आला आहात; पण वस्तुस्थिती ही आहे की, आता लोकच म्हणत आहेत की, यापेक्षा आपले बुरे दिनच बरे होते, असा टोमणाही त्यांनी मारला. सरकारची आर्थिक धोरणंच असफल झाल्याची टीकाही तिवारी यांनी केली. राज्यसभेत शून्य काळात प्रमोद तिवारी यांनी महागाईचा मुद्दा उपस्थित केला. ते म्हणाले की, सत्तारूढ पक्ष जेव्हा मत मागण्यासाठी जाईल तेव्हा त्यांना महागाईच्या मुद्यावरून महिलांच्या रोषाला सामोरे जावे लागेल. वेगाने महागाई वाढत आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांना उदरनिर्वाह करणे कठीण झाले आहे. >डाळी का भडकल्या? प्रमोद तिवारी म्हणाले की, रोजच्या जगण्यातील प्रत्येक आवश्यक वस्तू महाग झाली आहे, तर किमतीतील ही दरवाढ सुरूच आहे. त्यांनी असाही आरोप केला की, सत्तेत बसलेल्या काही जणांनी खास लोकांशी हातमिळवणी केली आहे. त्यामुळे आज डाळींच्या किमती प्रति किलो २०० रुपयांपर्यंत वाढल्या आहेत. महागाईमुळे भाज्या खरेदी करणे अशक्य झाले आहे. औद्योगिक विकास ठप्प झाला आहे. महागाई दर ५.७७ टक्क्यांवर गेला आहे. निर्यातीत १८ मार्चपासून घट दिसून येत आहे. >टोमॅटो, बटाटे, कांदे महागले एका अहवालानुसार ही महागाई विशेषत: टोमॅटो, बटाटे, कांदे यांच्याशी संबंधित आहे. बटाट्यांच्या किमतीत दर दुसऱ्या वर्षी वाढ होते, तर कांद्याचे व टोमॅटोचे दरही दर अडीच वर्षांनी वाढतात. एक वर्षांच्या अंतराने विशिष्ट भाज्यांच्या, वस्तूंच्या बाबतीत ही महागाई दिसून येते. हाच तर्क गृहीत धरला तर पुढील वर्षी कांद्याचे भाव भडकू शकतात, असेही या अहवालात म्हटले आहे. वस्तूंच्या चढ्या दराला कधी मोठे व्यापारीही कारणीभूत असतात.