शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंचा आज 'विजयी मेळावा'; उद्धव अन् राज २० वर्षांनंतर एकत्र दिसणार! किती वाजता सुरू होणार मेळावा?
2
Gold Price Today : आनंदाची बातमी! ...तर सोन्याच्या किंमती कमी होणार?, अर्थतज्ज्ञांनी कारण सांगितलं
3
"त्याच्यासोबतचं माझं नातं…’’,अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत संबंध ठेवणाऱ्या शिक्षिकेचा धक्कादायक दावा
4
Maharashtra Weather: मुंबई, ठाण्यात मुसळधार पाऊस कोसळणार; रत्नागिरी, रायगडसह 'या' जिल्ह्यांना आज ऑरेंज अलर्ट
5
Sena-MNS Rally: ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यापूर्वी संदीप देशपांडेंनी घातलेल्या टी-शर्टनं वेधलं लक्ष!
6
बाईकवरून आले अन् डोक्यातच घातल्या गोळ्या; प्रसिद्ध उद्योगपतीच्या हत्येनं परिसरात खळबळ
7
SIP: केवळ २.४० लाखांची गुंतवणूक आणि ₹४६.५६ लाखांचं व्याज; ही आहे कम्पाऊंडिंगची ताकद, कशी होईल ही कमाल?
8
मराठीवरून राजकीय रणकंदन, व्यावसायिक सुशील केडिया यांच्या ट्विटने वातावरण तापले
9
"तुमचे बाप ज्यावेळी डायपरमध्ये होते तेव्हापासून हा माणूस.."; मराठी अभिनेता कोणावर भडकला? व्हिडीओ तुफान व्हायरल
10
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य- ०५ जुलै २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार सोन्याहून पिवळा!
11
साेमनाथ सूर्यवंशीप्रकरणी पोलिसांवर गुन्हे दाखल करा; परभणीत कोठडीतील मृत्यू; खंडपीठाचे अंतरिम आदेश
12
अमेरिकन कंपनीचा शेअर बाजारात घोटाळा, जेन स्ट्रीट या ट्रेडिंग कंपनीने हेराफेरी करत मिळवला ३६,६७१ कोटींचा नफा; सेबीने कारवाई करत घातली थेट बंदी
13
कर्मचाऱ्यांना मिळणार ‘एनपीएस’प्रमाणे कर लाभ, ‘एकीकृत पेन्शन योजने’ला प्रोत्साहन देण्यासाठी निर्णय
14
८०% ‘जेन झी’ला करायचंय ‘एआय’शी लग्न, एआय पार्टनर्स आता मानवी नात्यांची जागा घेईल
15
तुझ्या भेटीची लागली आस... विठ्ठल मंदिर, प्रदक्षिणा मार्ग, स्टेशन रोड, चंद्रभागा वाळवंट परिसरात वैष्णवांची मांदियाळी
16
मेडिकल कॉलेजांच्या भ्रष्टाचारातील दलालांचा सीबीआयकडून पर्दाफाश; एफआयआरमध्ये बड्या अधिकाऱ्यांसह ३४ नावे
17
सरकारी वकील बदलल्याबाबत प्रतिज्ञापत्र द्या, पायल तडवी आत्महत्या : हायकोर्टाचे सरकारला निर्देश
18
मतदान केंद्र निश्चितीचे निवडणूक आयोगाचे आदेश; राजकीय पक्षांच्या बैठका घेण्याचीही अधिकाऱ्यांना सूचना
19
बारसे आटोपून निघाले, ‘समृद्धी’वर ४ ठार; सर्व मृत एकाच कुटुंबातील; चालकाची डुलकी जीवघेणी

बुडीत कर्जांच्या पुनर्रचनेसाठी ‘बॅड बँके’ची झाली नोंदणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2021 06:12 IST

रिझर्व्ह बँकेकडे मागितला परवाना; वित्तक्षेत्रातील मोठे पाऊल

लोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली : बुडीत कर्जांची पुनर्रचना व वसुली करण्यासाठी सुमारे सहा हजार कोटी रुपये पतमूल्य असलेली नॅशनल ॲसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी लिमिडेट (एनएआरसीएल) किंवा बॅड बँकेची नोंदणी झाली असून, तिला व्यवसाय करता यावा यासाठी इंडियन बँक असोसिएशनने (आयबीए) रिझर्व्ह बँकेकडे परवाना मागितला आहे.

एनएआरसीएलची कंपनी रजिस्ट्रारकडे गेल्या महिन्यात नोंदणी करण्यात आली. सूत्रांनी सांगितले की, एनएआरसीएलने प्रारंभीचे १०० कोटी रुपयांचे भागभांडवल गोळा केले आहे. बुडीत कर्जांची पुनर्रचना व वसुलीचा व्यवसाय करण्यासाठी परवाना द्यावा असा अर्ज एनएआरसीएलने रिझर्व्ह बँकेकडे केला आहे. अशी कंपनी किंवा बॅड बँक सुरू करायची असल्यास प्रारंभीच्या भांडवलाची दोन कोटी रुपये असलेली मर्यादा रिझर्व्ह बँकेने २०१७ सालापासून १०० कोटी रुपयांपर्यंत वाढविली आहे. एनएआरसीएलला परवाना मिळण्यास सप्टेंबर किंवा ऑक्टोबरही उजाडू शकतो.

एनएआरसीएलच्या संचालक मंडळावर काही लोकांची नियुक्तीही करण्यात आली. बुडीत कर्जे वसूल करण्याच्या विषयातील स्टेट बँक ऑफ इंडियामधील तज्ज्ञ पी. एम. नायर यांना एनएआरसीएच्या व्यवस्थापकीय संचालकपदी नेमण्यात आले आहे. या कंपनीच्या संचालक मंडळात आयबीएचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील मेहता, एसबीआयचे उपव्यवस्थापकीय संचालक एस.एस. नायर, कॅनरा बँकेचे मुख्य व्यवस्थापक अजित कृष्णन नायर यांचा समावेश आहे.

वित्तमंत्र्यांनी केली होती सूचनाnकेंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी २०२१-२२चा अर्थसंकल्प सादर करताना सांगितले होते की, सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी बुडीत कर्जांची पुनर्रचना व मालमत्ता  व्यवस्थापनासाठी एक कंपनी स्थापन करायला हवी. तिच्या हाती बुडीत कर्जांची प्रकरणे सोपवावी. nत्यानुसारच इंडियन बँक असोसिएशनने गेल्या वर्षी इंडियन बँक असोसिएशनने एनएआरसीएल रूपाने अशी कंपनी स्थापन करण्याचा प्रस्ताव तयार केला. तो केंद्र सरकारने स्वीकारला आहे.

टॅग्स :bankबँकReserve Bank of Indiaभारतीय रिझर्व्ह बँक