शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

बच्चन उत्तर द्या, नवरत्न 'ठंडा-ठंडा, कुल-कुल' कसं ?

By sagar.sirsat | Updated: August 3, 2017 11:16 IST

शेव्हिंग क्रीमच्या जाहिरातीमुळे बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान अडचणीत सापडण्याची चिन्हं असताना महानायक अमिताभ बच्चनही अडचणीत सापडण्याची शक्यता. नवरत्न 'ठंडा-ठंडा, कुल-कुल' कसं ठरतं? याबाबत अमिताभ यांनी उत्तर द्यावं.

ठळक मुद्देमध्य प्रदेशच्या जबलपूर येथील ग्राहक मंचाने अमिताभ बच्चन आणि  नवरत्न तेल निर्माती कंपनी इमामी यांना ग्राहकांची दिशाभूल केल्याबद्दल उत्तर मागितलं आहे. तेलाच्या जाहिरातीत अमिताभ म्हणतात की, हे तेल थंड थंड, कुल कुल आहे पण असं का आहे याबाबत ते काही सांगत नाहीत. तेलामध्ये कोणत्या घटकांचा किती प्रमाणात वापर करण्यात आलाय याबाबतही ते काही माहिती देत नाहीत. जाहिरातीत डोकेदुखी, शरीराच्या वेदनांपासून मुक्ती मिळेल असं सांगितलं जातं, त्यामुळे हे तेल आहे की औषध असा प्रश्न

भोपाळ, दि. 3 - शेव्हिंग क्रीमच्या जाहिरातीमुळे बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान अडचणीत सापडण्याची चिन्हं असताना महानायक अमिताभ बच्चनही अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. मध्य प्रदेशच्या जबलपूर येथील ग्राहक मंचाने अमिताभ बच्चन आणि  नवरत्न तेल निर्माती कंपनी इमामी यांना ग्राहकांची दिशाभूल केल्याबद्दल उत्तर मागितलं आहे. ग्राहक मंचाकडून या प्रकरणाची सुनावणी सुरू करण्यात आली असून  नवरत्न 'ठंडा-ठंडा, कुल-कुल' कसं ठरतं? याबाबत अमिताभ यांना विचारणा केली आहे.     

एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, जबलपूरचे रहिवासी पी.डी. बाखले यांनी येथील जिल्हा ग्राहक मंचाकडे नवरत्न तेलाची जाहिरात दिशाभूल करणारी असल्याची तक्रार केली आहे. या तक्रारीवर ग्राहक मंचाचे अध्यक्ष सुनील कुमार श्रीवास्तव यांनी अमिताभ बच्चन आणि इमामी कंपनी यांना समन्स जारी करून उत्तर मागितलं आहे. 

बाखले यांचे वकील ओ.पी. यादव म्हणाले, ''अमिताभ बच्चन यांच्याकडून नवरत्न तेलाबाबत दिशाभूल करणारा प्रचार केला जात आहे. हा ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्या नियमांचं उल्लंघन आहे. तेलाच्या जाहिरातीत अमिताभ म्हणतात की, हे तेल थंड थंड, कुल कुल आहे पण असं का आहे याबाबत ते काही सांगत नाहीत.  यामध्ये कोणत्या घटकांचा किती प्रमाणात वापर करण्यात आलाय याबाबतही ते काही माहिती देत नाहीत. हे तेल नोंदणीकृत नाही किंवा या तेलाच्या नीर्मितीचा परवानाही नाही. जाहिरातीत डोकेदुखी, शरीराच्या वेदनांपासून मुक्ती मिळेल असं सांगितलं जातं, त्यामुळे हे तेल आहे की औषध असा प्रश्न पडतो'' असं ते म्हणाले.  

यापूर्वी काल शेव्हिंग क्रीमच्या जाहिरातीमुळे बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानला भोपाळच्या स्थानिक न्यायालयाने नोटीस पाठवली आहे. एका याचिकेवर सुनावणी करताना विशेष न्यायाधीश काशीनाथ सिंह यांनी सोमवारी शाहरुख खानसह चार जणांना नोटीस जारी केली आहे. या सगळ्यांना 26 ऑगस्टला न्यायालयात उत्तर देण्याचे आदेश दिले आहेत. राजकुमार पांडे नावाच्या व्यक्तीने ही याचिका दाखल केली आहे. “शाहरुख खानने एका शेव्हिंग क्रीमची जाहिरात केली आहे. ही देशाची एक नंबर क्रीम असल्याचं सांगत या जाहिरातीद्वारे शाहरुख लोकांची दिशाभूल करत आहे,” असा आरोप याचिकेत करण्यात आला आहे.“ही क्रीम लावल्यामुळे माझ्या चेहऱ्यावर पुरळ आले. सरकारी रुग्णालयात त्यावर उपचार केले. ही क्रीम मध्यप्रदेश अन्न आणि औषध विभागाकडे तपासणीसाठी पाठवली. तपासणीत ही क्रीम वाईट दर्जाची असल्याचं समोर आलं,” असंही राजकुमार पांडे यांनी याचिकेत सांगितलं.