शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

हृदयद्रावक वडिलांची 'ती' चूक दीड वर्षीय लेकाच्या जीवावर बेतली; पाण्याची बाटली समजून मुलाने...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2022 16:26 IST

पालकांसह घरची सर्व मंडळी देखील मुलं सोबत असली की विशेष काळजी घेतात. पण कधी कधी मुलांकडे दुर्लक्ष करणं त्यांच्या जीवावर देखील बेतून शकतं.

लहान मुलं घरामध्ये असतील तर नेहमीच सावध असावं लागतं. छोट्या-मोठ्या गोष्टींकडे अत्यंत बारकाईन लक्ष द्याव लागतं. ते कधी कोणती गोष्ट पटकन तोंडात टाकतील किंवा मग खाली पडतील याचा काही नेम नाही. त्यामुळे पालकांसह घरची सर्व मंडळी देखील मुलं सोबत असली की विशेष काळजी घेतात. पण कधी कधी मुलांकडे दुर्लक्ष करणं त्यांच्या जीवावर देखील बेतू शकतं. अशीच एक हृदयद्रावक घटना आता समोर आली आहे. ओडिशाच्या बालासोरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. 

वडिलांचा निष्काळजीपणा चिमुकल्याच्या जीवावर बेतला आहे. पाण्याऐवजी लेकाने चुकून डिझेल प्यायलं. यामध्ये मुलाचा मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एक दीड वर्षांचा मुलगा पाणी समजून डिझेल प्यायला. यामध्ये मुलाने जीव गमावला आहे. उपचारासाठी मुलाला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं पण त्याचा मृत्यू झाला. या घटनेने कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलाचे वडील वाहन दुरुस्त करत होते. जवळच डिझेलची बाटली होती. खेळता खेळता दीड वर्षांचा लेक तिथे आला. बाटलीत पाणी असल्याचं समजून त्याने ती तोंडाला लावली. डिझेल पोटात गेल्यानं मुलाची तब्येत बिघडली. मुलाला उलट्या झाल्या. तसेच श्वास घेण्यासही त्रास जाणवला. उपचारासाठी कुटुंबीयांनी जवळच्या रुग्णालयात नेलं. तेथून मुलाला दुसऱ्या रुग्णालयात नेण्यास सांगितलं. 

मुलाला भुवनेश्वर एम्समध्ये नेण्यात आलं. मात्र त्याच्या प्रकृतीत सुधारणा झाली नाही. मुलाचा मृत्यू झाला. डॉक्टरांनी मुलाच्या मृत्यूची घटना दुर्दैवी असल्याचं म्हटलं. मुलाच्या वडिलांनी डिझेलची बाटली खालीच ठेवली होती. त्यांचं लक्ष नसताना मुलानं पाणी समजून बाटली तोंडाला लावली. त्यामुळे त्याचा मृत्यू झाला. पालकांनी सतर्क असायला हवं आणि असे प्रकार टाळायला हवेत असं म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"