शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
4
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
5
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
6
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
7
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
8
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
9
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
10
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
11
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
12
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
13
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
14
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
15
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
16
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
17
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
18
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
19
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
20
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...

'बाबरी मशीद पुन्हा बांधा', उत्तर प्रदेशातील शहरांमध्ये झळकले पोस्टर्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2017 14:25 IST

उत्तर प्रदेशमधील काही शहरांमध्ये मशीदीच्या पुनर्बांधणीसाठी आंदोलन करणार असल्याचा दावा करणारे पोस्टर्स लावण्यात आले आहेत.

ठळक मुद्देउत्तर प्रदेशमधील काही शहरांमध्ये मशीदीच्या पुनर्बांधणीसाठी आंदोलन करणार असल्याचा दावा करणारे पोस्टर्स लावण्यात आले आहेत. उत्तर प्रदेश पोलिसांनी या प्रकरणाची दखल घेत मेरठमधील पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या विरोधात एफआयआर दाखल केला आहे.

लखनऊ- बाबरी मशीद विध्वंसाच्या घटनेला आज 25 वर्ष पूर्ण झाली. 25 वर्षांनंतर आज म्हणजेच बुधवारी संध्याकाळी उत्तर प्रदेशमधील काही शहरांमध्ये मशीदीच्या पुनर्बांधणीसाठी आंदोलन करणार असल्याचा दावा करणारे पोस्टर्स लावण्यात आले आहेत. सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणाच्या अंतिम सुनावणीला मंगळवारपासून सुरुवात झाली. दरम्यान, या प्रकरणी पुढील सुनावणी ८ फेब्रुवारी २०१८ रोजी होणार असल्याचे न्यायालयाने सांगितलं. उत्तर प्रदेश पोलिसांनी या प्रकरणाची दखल घेत मेरठमधील पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या विरोधात एफआयआर दाखल केला आहे. पोस्टर लावण्याच्या मागे याच संघटनेचा हात असल्याचं बोललं जातं आहे. 

 

पोस्टरनुसार या आंदोलनाची चिथावणी पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाकडून (पीएफआय) दिली जाते आहे. 'हम भूल न जाएं, धोखे के 25 साल, बाबरी मस्जिद की दोबारा तामीर करो।', असं पोस्टरवर नमूद करण्यात आलं आहे. पश्चिम उत्तर प्रदेशातील मेरठ, गाझियाबाद, अलीगढ, हाथरस आणि सहारनपूरमधील शहरात आंदोलनाचे पोस्टर्स लावण्यात आल्याचं एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं आहे. पीएफआय पश्चिम यूपीतील काही लोकांना एकत्र करून दिल्लीत आंदोलन करण्याची शक्यता असल्याचं पोलिसांनी म्हंटलं आहे.

बाबरी मशीद पाडल्याच्या घटनेला आज २५ वर्ष पूर्ण झाली आहेत. त्या पार्श्वभूमीवर 6 डिसेंबर हा शौर्य दिन म्हणून साजरा करण्याची घोषणा बजरंग दल आणि शिवसेनेने केली आहे. या दिवशी नागरिकांनी शांतता राखावी, असं आवाहन पोलिसांनी केलं आहे. तसंच, अशांतता पसरवण्याचा प्रयत्न समाजकंटकांकडून केला जाण्याची शक्यता लक्षात घेऊन गृह मंत्रालयाने संशयित हालचालींवर करडी नजर ठेवण्याचं आदेश पोलीस प्रशासनाला दिले आहेत.

अयोध्येत कडेकोट सुरक्षा व्यवस्थाबाबरी मशीद विध्वंसाच्या २५ व्या वर्षपूर्तीनिमित्त सामाजिक गटांकडून अयोध्या परिसरात काही अनुचित प्रकार घडू नयेत यासाठी उत्तर प्रदेश पोलिसांकडून मोठी सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. त्याचबरोबर केंद्र सरकारकडून या पार्श्वभूमीवर सर्व राज्यांना सतर्कतेचे आणि कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत.उत्तर प्रदेश सरकारने सुरक्षाव्यवस्थेसाठी केंद्रीय सशस्त्र पोलिस दलाच्या (सीएपीएफ) आठ तुकड्यांची मागणी केली आहे. त्याचबरोबर रॅपिड अॅक्शन फोर्स (आरएएफ), सीआरपीएफच्या दोन तुकड्याही येथे तैनात करण्यात आल्या आहेत.