शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: कलमा पढायला सांगितलं, पँट काढली अन्...! पहलगाममध्ये दहशतवाद्यांचा उन्माद; धर्म विचारून २७ जणांची हत्या
2
हा देशाच्या एकता व अखंडतेवर हल्ला, पहलगाम हल्ल्याचा संघाकडून निषेध
3
हॉस्टेलच्या रूममध्येच 'ती'ने संपविले जीवन; सोलापुरातील धक्कादायक घटना
4
लग्नानंतर सातव्या दिवशीच नौदलाच्या अधिकाऱ्याची दहशतवाद्यांकडून हत्या; हनिमूनसाठी गेले होते विनय नरवाल
5
अमरनाथ यात्रेपूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; TRF च्या टेरर मॉड्यूलने चिंता वाढली
6
चोरीच्या आरोपातून दोन तरूणांना बैलबंडीला जुंपले; व्हीडिओ व्हायरल, १० जणांवर गुन्हा दाखल
7
IPL 2025 LSG vs DC : लखनौच्या संघासमोर केएल राहुलचा रुबाब; सिक्सर मारत संपवली मॅच
8
पहलगाम मध्ये तुमच्या ओळखीचे कुणी अडकले असेल तर 'या' तीन क्रमांकावर साधू शकता संपर्क
9
Rishabh Pant : पंतनं हिंमत दाखवली नाही की, तो किंमत शून्य झालाय? एक निर्णय अन् अनेक प्रश्न
10
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
11
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
12
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
13
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
14
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
15
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
16
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
17
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
18
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल
19
बजाजच्या या शेअरनं दिला 22000% हून अधिकचा परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल; आता...!
20
पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींचा गृहमंत्र्यांना फोन; अमित शाहांना जम्मू-काश्मीरला जाण्याची सूचना

Babri Masjid Case: सगळेच निर्दोष असतील, तर मग बाबरी मशीद जादूनं पडली का?; ओवेसींचा सवाल

By कुणाल गवाणकर | Updated: September 30, 2020 15:15 IST

Babri Masjid Case: सीबीआयच्या निकालावर असदुद्दीन ओवेसींकडून अनेक प्रश्न उपस्थित

नवी दिल्ली: बाबरी मशीद प्रकरणातील सगळेच आरोपी निर्दोष आहेत. मग बाबरी मशीद कोणी तोडली. ती जादूनं पडली का?, असा सवाल एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी केला आहे. देशाच्या एकतेवर आणि अखंडतेवर विश्वास असणाऱ्यांसाठी आज काळा दिवस आहे. हिंसाचार केल्यास न्याय मिळतो, असा संदेश आज देण्यात आला, अशा शब्दांत ओवेसींनी न्यायालयाच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली.लखनऊमधील सीबीआयच्या विशेष न्यायालयानं बाबरी मशीद प्रकरणातील ३२ आरोपींची आज सुटका केली. ही घटना पूर्वनियोजित नव्हती. तर ती अचानक घडल्याचं न्यायालयानं निकाल देताना म्हटलं. न्यायालयाच्या निकालावर ओवेसींनी अनेक प्रश्न उपस्थित केले. 'कोणीच दोषी नसेल तर मग बाबरी मशीद जादूनं पडली का? मशिदीत जादूनं मूर्ती ठेवण्यात आल्या का? मशिदीचं कुलूप जादूनं उघडण्यात आलं का?,' असे सवाल त्यांनी विचारले.हिंसाचार केल्यास न्याय मिळतो, असा संदेश देणारा निकाल सीबीआयच्या न्यायालयानं दिल्याचं ओवेसी म्हणाले. 'लालकृष्ण आडवाणींनी रथयात्रा काढली. त्यावेळी हिंसाचार झाला. जाळपोळ झाली. घरं पेटवून देण्यात आली. कुटुंब उद्ध्वस्त झाली. एक धक्का ओर दौ, बाबरी मशीद तोड दो, अशा घोषणा उमा भारतींनी दिल्या होत्या. मशीद पाडल्यानंतर लालकृष्ण आडवाणी आणि मुरली मनोहर जोशींनी मिठाई वाटली होती. त्यांनी राजकीय लाभासाठी मशीद पाडली. पुढे यातूनच त्यांना सत्ता मिळाली आणि याच सगळ्यांची आज निर्दोष मुक्तता झाली,' असं ओवेसी म्हणाले.बाबरी मशीद पाडण्यासाठी भाजपच्या नेत्यांनी चिथावणी दिली होती आणि हे संपूर्ण जगानं पाहिलं, अशा शब्दांत ओवेसींनी भाजपच्या नेत्यांना लक्ष्य केलं. 'बाबरी मशीद पाडण्यासाठी कट रचला गेला. मशीद पाडली जाईपर्यंत तुम्ही राजीनामा देऊ नका, असं आडवाणींनी कल्याणसिंह यांना सांगितलं होतं. पुढे हेच कल्याणसिंह राज्यपाल झाले. आडवाणी उपपंतप्रधान झाले. उमा भारती केंद्रात मंत्री झाल्या. बाबरी पाडून त्यावरच या सगळ्या नेत्यांची त्यांची कारकीर्द उभी राहिली,' असं ओवेसी म्हणाले.

टॅग्स :babri masjidबाबरी मस्जिदbabri masjid verdictबाबरी मशीद निकालAsaduddin Owaisiअसदुद्दीन ओवेसीLal Krishna Advaniलालकृष्ण अडवाणी