शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

पीसीआयच्या सदस्यत्वाचा बी. आर. गुप्तांचा राजीनामा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2020 05:08 IST

नवी दिल्ली : प्रेस कॉन्सिल आॅफ इंडियाचे (पीसीआय) सदस्य आणि भोपाळस्थित वृत्त संघटनेचे समूह संपादक बी. आर. गुप्ता यांनी ...

नवी दिल्ली : प्रेस कॉन्सिल आॅफ इंडियाचे (पीसीआय) सदस्य आणि भोपाळस्थित वृत्त संघटनेचे समूह संपादक बी. आर. गुप्ता यांनी पदाचा राजीनामा दिला.राजीनाम्याचे कारण सांगताना गुप्ता यांनी म्हटले की सध्या ‘मोठ्या संकटात’ असलेल्या प्रसारमाध्यमासाठी मी व्यक्तीश: किंवा एकत्रितरित्या काम करण्यास समर्थ नाही. गुप्ता यांची पीसीआयच्या सदस्यपदी ३० मे, २०१८ रोजी तीन वर्षांसाठी नियुक्ती झाली होती.‘‘प्रेस कॉन्सिल आॅफ इंडियाचा सदस्य या नात्याने मी माझा राजीनामा दिला आहे’’, असे गुप्ता यांनी वृत्तसंस्थेला सांगितले. ते म्हणाले, पीसीआयची जबाबदारी प्रसारमाध्यमाला आणि त्यातील व्यावसायिकांना सतत प्रोत्साहन देण्याची होती. परंतु, आता प्रसारमाध्यम हे फारच मोठ्या संकटात आहे. ज्या हेतुने परिषदेची स्थापना झाली होती तो सफल होत नाही आणि मला मी माध्यमाच्या स्वातंत्र्यासाठी काही उल्लेखनीय काम करत नाही याची जाणीव झालेली आहे. गुप्ता हे एक्स्प्रेस समुहाशी संबंधित आहेत.गुप्ता यांनी पीसीआय ही प्रसारमाध्यमासाठी पूर्णपणे प्रतिनिधित्व करणारी संस्था नव्हती, असाही दावा केला. या परिस्थितीत प्रसारमाध्यम आणि त्यातील लोक हे ज्या परिस्थितीला तोंड देत आहेत त्यातून आम्ही कसे बाहेर येणार. हे आमच्यासाठी मोठेच आव्हानआहे.मी राजीनामा दिला कारण मी व्यक्तीश: आणि सामुहिकरित्या काम करण्यास सदस्य या नात्याने समर्थ नाही, असे बी. आर. गुप्ता म्हणाले.प्रसारमाध्यमांत वेतनात झालेली कपात आणि अनेकांना गमवाव्या लागलेल्या नोकऱ्यांचा उल्लेख करून गुप्ता म्हणाले, हे दोन्ही घटक सामाजिक, राजकीय आणि आर्थिक न्यायासाठी लढत आहेत.पीसीआयचे अध्यक्ष न्यायमूर्ती सी. के. प्रसाद यांना संपर्क साधला असता गुप्ता यांचा राजीनामा अजून स्वीकारला गेलेला नाही, असे त्यांनी सांगितले.