शहरं
Join us  
Trending Stories
1
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
2
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
3
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
4
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
5
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
6
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
7
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
8
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
9
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
10
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
11
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
12
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
13
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
14
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
15
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
16
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
17
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
18
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
19
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
20
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या

मोदींच्या हस्तक्षेपाची आझाद यांची मागणी

By admin | Updated: December 25, 2015 00:54 IST

दिल्ली क्रिकेट संघटनेतील भ्रष्टाचाराचा(डीडीसीए) मुद्दा उपस्थित केल्यामुळे निलंबित करण्यात आलेले भाजपचे खासदार कीर्ती आझाद यांनी मी काय चूक केली ते सांगा?

नवी दिल्ली : दिल्ली क्रिकेट संघटनेतील भ्रष्टाचाराचा(डीडीसीए) मुद्दा उपस्थित केल्यामुळे निलंबित करण्यात आलेले भाजपचे खासदार कीर्ती आझाद यांनी मी काय चूक केली ते सांगा? असा थेट सवाल करीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्तक्षेपाची मागणी केली आहे. दुसरीकडे भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, शांताकुमार आणि यशवंत सिन्हा यांनी गुरुवारी बैठक घेत आझाद यांचे निलंबन आणि पक्षनेतृत्वासंबंधी मुद्यांवर चर्चा केली. पक्षातील बुजुर्ग नेते पुन्हा सक्रिय होत असल्याचे संकेत त्यातून मिळाले आहेत.माझा लढा डीडीसीएमधील भ्रष्टाचाराशी आहे. वैयक्तिक पातळीवर कुणाशीही नाही, असे बिहारमधील दरभंगा येथील खासदार असलेल्या आझाद यांनी अहमदाबाद येथे पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. भ्रष्टाचारप्रकरणी न्यायालयाच्या निगराणीखाली तपासाची मागणी करण्याचे संकेतही दिले आहेत. पंतप्रधान माझी विनंती ऐकून घेतील अशी आशा आहे. पक्षातील ज्येष्ठांचा समावेश असलेल्या मार्गदर्शक मंडळानेही समोर येत या मुद्याकडे लक्ष द्यावे, अशी विनंती करणार असल्याचे त्यांनी सांगितले. अर्थमंत्री अरुण जेटली यांच्याविरुद्धच्या भ्रष्टाचारविरोधी मोहिमेचे नेतृत्व करणाऱ्या आझाद यांच्याविरुद्ध भाजपने बुधवारी निलंबनाचा व्हीप जारी करताच तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. जेटलींची प्रतिष्ठा घालवण्यासाठी आझाद यांनी काँग्रेस आणि आपशी हातमिळवणी केल्याचा आरोप होत आहे. मला पक्षाकडून निलंबनाची नोटीस मिळाली असली तरी विशिष्ट कारणे स्पष्ट केलेली नाहीत. मी पक्षविरोधी कारवायांमध्ये गुंतलो आहे असे म्हणायचे आहे काय? माझा नेमका दोष काय? मी पक्षाविरुद्ध काहीही केलेले नाही. मी केवळ डीडीसीएमधील भ्रष्टाचाराबद्दल बोललो. मोदी माझी विनंती ऐकून घेतील आणि मला न्याय देतील, अशी मला आशा आहे, माझा त्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे, असे आझाद म्हणाले. (लोकमत न्यूज नेटवर्क)> मी काय चूक केली याचे उत्तर हवे आहे...भाजप आणि रा.स्व. संघाने नेहमीच भ्रष्टाचार उखडून टाकण्याची भाषा केली आहे. महात्मा गांधी यांच्या मार्गावर चालण्याबाबत आम्ही बोलतो. त्यामुळेच या मुद्यावर मी मोदींच्या हस्तक्षेपाची मागणी केली आहे. त्यांनी या प्रकरणाच्या खोलात जावे. मी काय चूक केली याचे विशिष्ट असे उत्तर हवे आहे, असेही त्यांनी नमूद केले. गुरुवारी पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी आझाद यांच्या निलंबनाचा आदेश जारी केला.... तर सीबीआयची पंचाईत होईलडीडीसीएला नोटीस जारी करू नये. अशा नोटिसीनंतर फाईल गहाळ होतात. उद्या मला न्यायालयीन निगराणीत तपासाची मागणी करण्यासाठी न्यायालयात जायचे झाल्यास, सीबीआयची पंचाईत होईल, असे सांगत आझाद यांनी फायली गहाळ होण्याच्या गंभीर मुद्याकडे लक्ष वेधले. भाजपचे ज्येष्ठ नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी मला निलंबनाच्या नोटिसीबाबत उत्तर सादर करण्यासाठी मदतीची तयारी दर्शविली आहे, अशी माहिती त्यांनी दिली. अडवाणी गटाची बैठकबिहारमधील पराभवानंतर अडवाणी गटाने १० नोव्हेंबर रोजी दिवाळीच्या पूर्वसंध्येला निवेदन जारी करीत पक्षातील असंतोषाला तोंड फोडले होते. गुरुवारी या गटाने घेतलेल्या बैठकीनंतर कोणतेही निवेदन किंवा जाहीर भाष्य केलेले नाही. याउलट योग्य वेळी, योग्य व्यासपीठावर हा मुद्दा मांडला जाईल असे स्पष्ट केले. जेटलींसंबंधी भ्रष्टाचाराच्या मुद्यावर चर्चा झाली काय? या प्रश्नावर एका ज्येष्ठ नेत्याने ‘अर्थातच’ एवढे उत्तर देत पार्श्वभूमीकडे अंगुलीनिर्देश केला. अडवाणी, शांता कुमार आणि यशवंत सिन्हा यांनी मुरलीमनोहर जोशी यांच्या निवासस्थानी जवळजवळ तासभर चर्चा केली. आम्ही भेटलो, चहा घेतला असे सांगत शांताकुमार यांनी भाष्य टाळले. बिहारमधील पराभवानंतर या चार नेत्यांनी मोदी आणि शहा या जोडगोळीवर थेट हल्ला करीत पराभवाची जबाबदारी निश्चित करण्याची मागणी करणारे निवेदन जारी केले होते.आझाद यांच्या निलंबनावरून मोदींवर टीकालखनौ : दिल्ली आणि जिल्हा क्रिकेट असोसिएशन (डीडीसीए) मधील घोटाळ्यावरून वित्तमंत्री अरुण जेटली यांच्याविरुद्ध मोहीम उघडणारे भाजपचे खासदार कीर्ती आझाद यांना पक्षातून निलंबित केल्याबद्दल काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर प्रखर टीका केली आहे. ‘ना खाऊंगा, ना खाने दुंगा,’ या मोदी यांच्या निवडणूक नाऱ्याचे त्यांना स्मरण करून देत, डीडीसीए घोटाळ्याची चौकशी करण्याची मागणी राहुल गांधी यांनी केली.‘निवडणूक प्रचारात मोदी भ्रष्टाचार व घोटाळ्यांबद्दल बोलले. भ्रष्टाचार खपवून घेणार नाही, असे ते वारंवार सांगत होते; पण आता घोटाळे घडत आहेत आणि नुकताच डीडीसीए घोटाळा घडला आहे. या घोटाळ्याविरुद्ध आवाज उठविणाऱ्या खासदाराला निलंबित करण्यात आले आहे,’ असे राहुल म्हणाले. अमेठीच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावरून दिल्लीला परतताना ते लखनौ येथे आले असता पत्रकारांशी बोलत होते. ‘ना खाऊंगा, ना खाने दुंगा, असे सांगणारे मोदी आज मौन पाळून आहेत. लोकांचा त्यांच्यावरचा विश्वास कमी होऊ लागला आहे, असेही ते म्हणाले.मोदींनी कारवाई केली पाहिजे आणि जेटली हे १३ वर्षांपर्यंत अध्यक्ष राहिलेल्या डीडीसीएतील भ्रष्टाचाराची चौकशी करण्याचे आदेश त्यांनी दिले पाहिजेत, असे राहुल गांधी म्हणाले.राहुल गांधी यांनी वाढत्या महागाईवरून मोदींवर टीकास्त्र सोडले. महागाई वाढत असताना मोदी वारंवार परदेश दौरा करतात. या दौऱ्याने देशाचा कोणता फायदा होणार, असा सवाल त्यांनी केला. (वृत्तसंस्था)