नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरमधील पूर परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तडकाफडकी दौरा करीत उपाययोजनांची घोषणा केल्याबद्दल काँग्रेसचे नेते दिग्विजयसिंग आणि गुलाम नबी आझाद यांनी त्यांची प्रशंसा केली आहे. आपत्ती व्यवस्थापन प्रतिसाद दल (डीएमआरएफ), लष्कर, पोलीस, सुरक्षा दल तसेच केंद्र सरकार आणि पंतप्रधानांनी त्वरित कृती केल्यामुळे काश्मीरमधील लोकांच्या बचावकार्याला वेग आला आहे, त्याबद्दल ते अभिनंदनास पात्र आहेत, असे काँग्रेसचे सरचिटणीस दिग्विजयसिंग यांनी ट्विटरवर म्हटले. दिग्विजय हे कट्टर मोदीविरोधक मानले जातात. (वृत्तसंस्था)
आझाद आणि दिग्विजय यांनी केली मोदींची प्रशंसा
By admin | Updated: September 9, 2014 04:09 IST