हरीश गुप्ता
नवी दिल्ली : महाराष्ट्रात आयुष्मान भारत - प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अंतर्गत उपचार घेणाऱ्या रुग्णांच्या संख्येत एक वर्षात तब्बल तिपटीने वाढ झाली आहे. आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, ही वाढ देशातील सर्वाधिक वाढींपैकी एक ठरली आहे.
पीएमजेएवाय अंतर्गत पात्र कुटुंबांना दरवर्षी उपचारांसाठी ५ लाख रुपयांपर्यंत विमा मिळतो. आता महाराष्ट्रासमोरचे मोठे आव्हान म्हणजे ही गती कायम ठेवणे, ग्रामीण भागापर्यंत पोहोच वाढवणे आणि इतर राज्यांशी बरोबरी साधणे.
आयुष्मानचे लाभार्थी
राज्य २०२४-२५
कर्नाटक ३८ लाख
राजस्थान १९.२ लाख
छत्तीसगड १७.४ लाख
महाराष्ट्र १३ लाख+
बिहार ९.५ लाख
आयुष्मान भारत : महाराष्ट्रातील रुग्णांची संख्या
३.९ लाख
१३ लाख +
२०२४-२५
महाराष्ट्रासमोर आव्हाने काय?
पाच वर्षांमध्ये महाराष्ट्राची पीएमजेएवाय अंतर्गत कामगिरी सामान्य राहिली. २०२० ते २०२३ दरम्यान राज्यात सरासरी रुग्णांचे प्रमाण हे केवळ २.५ ते ३.९ लाख वार्षिक होते. यंदा त्यात जोरदार वाढ झाली. मात्र एकूण लाभार्थ्यांच्या संख्येत इतर राज्यांच्या तुलनेत अजूनही महाराष्ट्र मागेल आहे.
या अंतरामागे रचनात्मक व धोरणात्मक कारणे आहेत. महाराष्ट्राने दीर्घकाळ स्वतःची महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना राबवली. २०२०मध्ये ती पीएमजेएवायमध्ये समाविष्ट झाली असली तरी संपूर्ण राज्यासाठी विस्तृत कव्हरेज जुलै २०२४पासूनच सुरू झाले.