शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
4
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
5
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
6
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
7
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
8
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
9
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
10
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
11
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
12
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
13
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
16
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
17
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
18
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
19
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
20
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?

PM मोदी, मोहन भागवत अन्...रामललाच्या अभिषेकावेळी फक्त 'हे' 5 जण उपस्थित राहणार...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2023 17:00 IST

प्रभू श्रीरामाच्या प्रतिष्ठापणेवेळी गर्भगृहात फक्त पाच जण उपस्थित राहणार आहेत.

Ayodhya Ram Mandir: अयोध्येतील श्री राम मंदिराच्या उद्घाटनाची जय्यत तयारी सुरू आहे. प्रभू श्री रामाचे आगमन होत असल्यामुळे अयोध्येचा कानाकोपरा सजवण्यात आला आहे. 22 जानेवारी रोजी रामललाची प्रतिष्ठापणा होईल. या भव्य कार्यक्रमाच्या आयोजनाच्या वेळी गर्भगृहात केवळ 5 लोक उपस्थित राहणार आहेत. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्यपाल आनंदीबेन पटेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, RSS प्रमुख मोहन भागवत आणि मंदिराचे आचार्य (मुख्य पुजारी) अभिषेकावेळी गर्भगृहात उपस्थित राहतील.

रामललाच्या प्रतिष्ठापणेच्या दिवशी शेकडो व्हीआयपींसह देश-विदेशातून लाखो भाविक येणार आहेत. त्यामुळे अयोध्या प्रशासनही अलर्टवर आहे. शहरातील चौका-चौकात चोख बंदोबस्त लावण्यात आला आहे. पोलिसांसह सुरक्षा यंत्रणांची विशेष पथकेही शहरात दाखल झाली आहेत. स्वतः मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ या आयोजनावर बारकाईने लक्ष ठेवून आहेत.

उद्या, म्हणजेच 30 डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अयोध्येतील नवीन विमानतळ, रेल्वे स्टेशनचे उद्घाटन होणार आहेत. यावेळी पीएम मोदी वंदे भारत एक्सप्रेसलाही हिरवा झेंडा दाखवतील. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आज अयोध्या दौऱ्यावर आहेत. सीएम योगी राम मंदिराच्या कामाची आणि विमानतळ, रेल्वे स्टेशनचीही पाहणी करतील.

16 जानेवारीपासून सोहळ्याला सुरुवात7 दिवसीय प्राण प्रतिष्ठा सोहळा 16 जानेवारीपासून सुरू होणार आहे. 16 जानेवारीला विष्णूपूजा आणि गाय दान होईल. यानंतर 17 जानेवारीला रामललाची मूर्ती शहर भ्रमंती करून राम मंदिरात नेण्यात येईल. 18 जानेवारी रोजी गणेशाची पूजा केली जाणार आहे. यासोबतच वरुण देवपूजा आणि वास्तुपूजाही होणार आहे. 19 जानेवारी रोजी हवन अग्नि प्रज्वलित करण्यात येईल. 21 जानेवारी रोजी राम लालाच्या मूर्तीला पवित्र नद्यांच्या पवित्र पाण्याने स्नान घालण्यात येईल, तर 22 जानेवारी रोजी प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडेल.

प्राणप्रतिष्ठेसाठी खास मुहूर्त22 जानेवारी रोजी अयोध्येत नव्याने बांधण्यात आलेल्या राम मंदिरात राम ललाच्या अभिषेकसाठी 84 सेकंदांचा अत्यंत सूक्ष्म मुहूर्त असेल, ज्यामध्ये राम ललाला अभिषेक केला जाईल. काशीचे ज्योतिषी पंडित गणेशवर शास्त्री द्रविड यांनी हा शुभ काळ निवडला आहे. हा शुभ मुहूर्त केवळ 84 सेकंदांचा असेल, जो 12.29 मिनिटे 8 सेकंद ते 12.30 मिनिटे 32 सेकंदांपर्यंत आहे.

टॅग्स :Ram Mandirराम मंदिरAyodhyaअयोध्याNarendra Modiनरेंद्र मोदीMohan Bhagwatमोहन भागवतyogi adityanathयोगी आदित्यनाथ