शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात मोठी रेव्ह पार्टी...! एकनाथ खडसेंचा जावई ताब्यात, प्रसिद्ध बुकीसोबत दोन तरुणीही...
2
एअर इंडिया अपघात एक रहस्यच राहणार? शेवटच्या १० मिनिटांत ब्लॅक बॉक्समध्ये रेकॉर्डिंगच झाले नाही 
3
धक्कादायक! हरिद्वारमधील मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी, ६ भाविकांचा मृत्यू, अनेक जण जखमी
4
हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले...
5
"भयंकर परिणाम होतील...", ऊर्जामंत्री एके शर्मा संतापले; वीज अधिकाऱ्याचा ऑडिओ केला शेअर
6
माणिकराव कोकाटेंना साडेसातीची झळ, शनिदेव तारणार की राजकरणातून ‘मुक्ती’ देणार? लवकरच कळेल!
7
सोने ₹३२,००० वरून थेट १ लाखांवर! गेल्या ६ वर्षात २००% वाढ, पुढील ५ वर्षात 'इतकं' महाग होणार!
8
रात्री १२ वाजता सलमान खानची पोस्ट, म्हणाला, "बाबांचं आधीच ऐकलं असतं तर..."
9
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
10
‘धनुष्यबाण-घड्याळ’ वाटपात कौशल्य; महायुतीच्या कामी आल्याचे राहुल नार्वेकरांना बक्षीस मिळणार!
11
७ तासांपेक्षा कमी किंवा ९ तासांपेक्षा जास्त झोपता? लवकर मृत्यूचा धोका, रिसर्चमध्ये मोठा खुलासा
12
ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा
13
हायव्होल्टेज ड्रामा! पोराला घेऊन बॉयफ्रेंडच्या घरी गर्लफ्रेंड; बायको म्हणते "माझा नवरा असा नाही, हीच..."
14
"मी एका मोठ्या सिनेमात फेल झालो", फहाद फाजिलने पुन्हा 'पुष्पा'वर केलं भाष्य; पुढे म्हणाला...
15
भयंकर! अचानक लिफ्ट बंद पडली, आवाज देण्यासाठी डोकं बाहेर काढताच...; व्यावसायिकाचा मृत्यू
16
पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल
17
साप्ताहिक राशीभविष्य: ११ राशींना शुभ, चौफेर दुप्पट लाभ; सुबत्ता-भरभराट, ऑगस्टची सुरुवात ऑसम!
18
आजचे राशीभविष्य २७ जुलै २०२५ : नवीन कार्यारंभ करण्यास अनुकूल, कसा जाईल आजचा रविवार...
19
ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष चर्चा; शिष्टमंडळातील खासदारही सहभागी होणार
20
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी मालदीवच्या नेत्यांची लगबग, भेटी अन् चर्चा

अयोध्येतील प्रस्तावित मशीद आणि हॉस्पीटलचा आराखडा पाहिलात का?

By मोरेश्वर येरम | Updated: December 20, 2020 10:54 IST

अयोध्येतील प्रस्तावित ठिकाणी मशीद उभारण्याचं काम २६ जानेवारीपासून सुरू करण्याची तयारी देखील केली जात आहे.

ठळक मुद्देअयोध्येत धन्नीपूर येथे ५ एकर जागेत भव्या मशिद उभारली जाणारमशिदीला लागूनच सुसज्ज हॉस्पीटल उभारलं जाणारमशीद, हॉस्पीटलसह ग्रंथालय, संग्रहालय आणि इतर अनेक सुविधा असणार

लखनऊअयोध्येत भव्य राम मंदिराच्या निर्माणाला सुरुवात झाली असतानाच शनिवारी 'इंडो इस्लामिक कल्चरल फाउंडेशन'नेही या ठिकाणी उभारल्या जाणाऱ्या मशिदीचा आराखडा जारी केला आहे. 

अयोध्येतील प्रस्तावित ठिकाणी मशीद उभारण्याचं काम २६ जानेवारीपासून सुरू करण्याची तयारी देखील केली जात आहे. अयोध्येच्या धन्नीपूर येथील भागात मशीद उभारली जाणार आहे. मशिदीचं डिझाइन हे अंडाकार स्वरुपाचं मॉर्डन पद्धतीनं बांधण्यात येणार असून यात पारंपारिक पद्धतीचा घुमट ठेवण्यात आलेला नाही. विशेष म्हणजे, या मशिदीला लागूनच एक भव्य हॉस्पीटलची निर्मिती केली जाणार आहे. हॉस्पीटल आणि संग्रहालयाचंही डिझाइन जारी करण्यात आलं आहे. 

मशिदीचा आकाखडा मंजुर करुन घेण्याची तयारी देखील सुरु झाली आहे. धन्नीपूर येथे उभारली जाणारी मस्जिद ही दोन मजली असणार आहे. येत्या दोन वर्षात या मशिदीच्या उभारणीचं काम पूर्ण होईल अशी शक्यता आहे. मशिदीसोबतच सुसज्ज हॉस्पीटल, संग्रहालय, ग्रंथालय आणि समुदाय स्वयंपाकघर देखील उभारलं जाणार आहे. या संपूर्ण प्रकल्पाचा नेमका खर्च किती होईल याची माहिती अद्याप देण्यात आलेली नाही. 

महिलांसाठी विशेष जागामशिदीमध्ये महिलांसाठी एक वेगळी जागा निर्माण केली जाणार आहे. मशिदीत एकावेळी जवळपास २ हजार लोक नमाज पठण करू शकतील. तर हॉस्पीटलमध्ये २०० खाटांची व्यवस्था असेल. या हॉस्पीटलला सुपरस्पेशालिटी हॉस्पीटलचा दर्जा मिळेल अशा पद्धतीचं काम केलं जाणार आहे. 

सुप्रीम कोर्टाने गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात राम मंदिर आणि बाबरी मशिदीच्या वादग्रस्त मुद्द्यावर निकाल दिला होता. मशिदीच्या निर्मितीसाठी सुन्नी वक्फ बोर्डाला अयोध्येतच ५ एकर जागा देण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला दिले होते. त्यानंतर उत्तर प्रदेश सरकारने अयोध्येच्या सोहावालमधील धन्नीपूर गावात पाच एकर जमीन मशिदीसाठी दिली होती. 

टॅग्स :Ayodhyaअयोध्याbabri masjidबाबरी मस्जिदbabri masjid verdictबाबरी मशीद निकाल