शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
2
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
3
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती आहे UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
4
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
5
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
6
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
7
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
8
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
9
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
10
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
12
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
13
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
14
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
15
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
16
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
17
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
18
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
19
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
Daily Top 2Weekly Top 5

अयोध्या : तब्बल 500 वर्षांनी क्षत्रिय कुटुंबांनी पगडी, चामड्याची चप्पल घातली

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2019 11:34 IST

अयोध्येच्या बाजुलाच असलेल्या पूरा बाजार ब्लॉक आणि आसपासच्या 105 गावांतील सूर्यवंशी क्षत्रिय समाज राहतो.

लखनऊ : सर्वोच्च न्यायालयाने गेल्याच आठवड्यात अयोध्येतील राम मंदिर बाबत निकाल जाहीर केला. यामुळे राम मंदिर बांधण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. साऱ्या देशाने हा निकाल सकारात्मक दृष्टीने स्वीकारला आहे. याच बरोबर एका मोठ्या समाजाचा तब्बल 500 वर्षांपूर्वीचा संकल्प पूर्ण झाला आहे. 

अयोध्येच्या बाजुलाच असलेल्या पूरा बाजार ब्लॉक आणि आसपासच्या 105 गावांतील सूर्यवंशी क्षत्रिय समाज तब्बल 500 वर्षांनी पगडी बांधणार आहे. तसेच पायात चामड्याची चप्पल घालणार आहे. कारण राम मंदिराच्या निर्मितीचा संकल्प पूर्ण होणार आहे. या गावांतील क्षत्रिय समाजाच्या नागरिकांना पगड्या वाटल्या जात आहेत. सूर्यवंशी समाजाच्या पूर्वजांनी जेव्हा मंदिरावर हल्ला झाला होता तेव्हा शपथ घेतली होती. जोपर्यंत मंदिर पुन्हा बांधले जात नाही तोपर्यंत डोक्यावर पगडी आणि पायात चप्पल घालणार नाही. याचबरोबर छत्रीने डोके झाकणार नाही. 

सूर्यवंशी क्षत्रिय परिवार अयोध्या जिल्ह्याच्या 105 गावांमध्ये राहतात. हे सर्व ठाकूर परिवार भगवान रामाचे वंशज असल्याचे मानतात. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर या गावांमध्ये उत्सवाचे वातावरण आहे. सराय़रासीच्या न्यायालयात वकील असलेल्या बासदेव सिंह यांनी सांगितले की न्य़ायालयात आतापर्यंत 400 पगड्यांचे वाटप करण्यात आले आहे. या समाजाचे जवळपास दीड लाख लोक आहेत. त्यांनी गेली अनेक पिढ्या पगडी बांधलेली नाही.

लग्नावेळीही डोके उघडे ठेवून कापड गुंडाळले जात होते. त्यांच्या पूर्वजांनी चप्पल सोडण्याचा संकल्प केलेला तेव्हा चामड्याची पादत्राने मिळत होती. यामुळे या लोकांनी कधीच चामड्याचे चप्पल घातले नाही. आता या भागात चामड्याच्या चप्पलाची मागणी वाढली आहे.  

टॅग्स :Ayodhyaअयोध्याSupreme Courtसर्वोच्च न्यायालय