लग्नातील खर्च टाळून गावाच्या विकासासाठी वापरा
By admin | Updated: April 26, 2016 00:16 IST
वळसे-पाटील : अवसरीला सामुदायिक विवाह
लग्नातील खर्च टाळून गावाच्या विकासासाठी वापरा
वळसे-पाटील : अवसरीला सामुदायिक विवाहअवसरी : 'लग्नाच्या वरातीतील डीजे, दारू व सत्कार समारंभातील फेटे, टॉवेल, टोपी यासारख्या होणार्या अनावश्यक खर्चाला मर्यादा आणून, तो खर्च गावाच्या विकासासाठी वापरावा,' असे आवाहन विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप-वळसे पाटील यांनी केले. अवसरी खुर्द (ता. आंबेगाव) येथील खालच्या शिंदेमळा येथील वेताळेश्वर सामुदायिक विवाह सोहळ्यात ते बोलत होते. अवसरी खुर्द, खालचा शिंदेमळा येथील श्री वेताळेश्वर सामुदायिक विवाह सोहळा मंडळाच्या वतीने गेली २१ वर्षे सामुदायिक विवाह सोहळा राबवीत असल्याने याचा फायदा गोरगरीब कुटुंबांना होत आहे. रविवारी १२ सामुदायिक विवाह आयोजित करण्यात आले. सकाळी १० ते दुपारी १२ साखरपुडा, वर्हाडी मंडळींकरिता बुंदी, बटाटाभाजी, भातवरण असा जेवणाचा बेत होता. त्यानंतर नवरा-नवरी हळदीचा कार्यक्रम झाला. २ ते ४ नवरदेवाची ट्रक्टरवरून वाद्य लावून भव्य वरात काढण्यात आली. साडेचार वाजता विवाह झाल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष दगडू मारुती शिंदे यांनी दिली.सामुदायिक विवाह सोहळ्याचे नियोजन संचालक दगडू मारुती शिंदे, माजी सभापती आनंदराव शिंदे, माजी सरपंच कल्याणराव शिंदे, सोपानकाका शिंदे, नवनाथ शिंदे, बाळासाहेब शिंदे, भैरवनाथ शिंदे, सुरेश शिंदे, अशोक शिंदे, बाजीराव शिंदे, अनिल शिंदे यांनी केले. वळसे-पाटील म्हणाले, 'अवसरी खुर्द हे गाव आमदार आदर्श गाव योजनेत घेतले असल्याने गावातील जुन्या-नव्या कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन विकासकामे सुचविली पाहिजे. अवसरी गावात शासकीय तंत्रनिकेतन व अभियांत्रिकी कॉलेज झाल्याने अवसरी खुर्द गावाचे नाव जगाच्या नकाशावर गेले आहे. भविष्यात पाणीटंचाई जाणवू नये म्हणून जलयुक्त शिवार योजनेची कामे करण्यासाठी २ ते ३ दिवसांत प्रस्ताव सादर करावेत, अशा सूचना ग्रामपंचायत कार्यालयाला केल्या.'या प्रसंगी आंबेेगाव तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष देवदत्त निकम, भीमाशंकर कारखान्याचे उपाध्यक्ष बाळासाहेब बेंडे, संचालक ॲड. प्रदीप वळसे-पाटील, माऊली गावडे, शांताराम हिंगे, शरद बँकेचे संचालक विवेक वळसे-पाटील यांनी वधूवरांना आशीर्वाद दिले. फोटो : अवसरी खुर्द (ता. आंबेगाव) येथील श्री वेताळेश्वर सामुदायिक विवाह सोळळ्यात वधू-वरांना आशीर्वाद देताना दिलीप वळसे-पाटील.०००