शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

1 डिसेंबरपासून देशभरात कुठेही उडवू शकता ड्रोन, नागरी उड्डाण मंत्रालयाचा हिरवा कंदील

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2018 23:23 IST

देशभरात ड्रोन उडवण्यासाठी नागरिकांना परवानगी देण्यात आली आहे.

नवी दिल्ली- देशभरात ड्रोन उडवण्यासाठी नागरिकांना परवानगी देण्यात आली आहे. नागरी उड्डाण मंत्रालयानं यासंदर्भात एक नियमावली तयार केली असून, ती 1 डिसेंबर 2018पासून लागू होणार आहे. परंतु ड्रोनच्या वापरावर सरकारकडून काही अटीही घालण्यात आल्या आहेत.नागरी उड्डाण मंत्रालयाकडून रिमोटली पायलटेड एअरक्राफ्ट सिस्टीम(आरपीएएस)च्या वापरासंदर्भात ही नियमावली बनवली आहे. या नियमावलीनुसार एअरस्पेसला तीन नियमांमध्ये विभागण्यात आलं आहे. पहिल्या रेड झोन(रेड झोनमध्ये तुम्हाला उड्डाणाची परवानगी नसते.)मध्ये तुम्ही एअरपोर्ट, आंतरराष्ट्रीय बॉर्डर, दिल्लीचा विजय चौक, राज्यांचे सचिवालय आणि सुरक्षेसंदर्भातील अन्य स्थळांवर ड्रोन उडवू शकत नाही. यल्लो झोन(नियंत्रित वायू क्षेत्र) आणि ग्रीन झोन(ड्रोन उडवण्याची परवानगी)मध्ये ड्रोन उडवण्याची परवानगी आहे. तुम्ही ड्रोनचा वापर 400 फुटांच्या उंचीपर्यंत करू शकता, असंही नियमावलीतून स्पष्ट करण्यात आलं आहे.तसेच ड्रोनबाबतही पाच श्रेणी ठरवण्यात आल्या आहेत. ज्यात नॅनो ड्रोन-250 ग्रॅम, मायक्रो ड्रोन- 250 ग्रॅमपासून 2 किलो, मिनी ड्रोन- दोन किलोपासून 25 किलो, स्मॉल ड्रोन- 25 किलोपासून 150 किलो आणि लार्ज ड्रोन- 150 किलोंचा सहभाग आहे. विशेष म्हणजे ड्रोन उडवणा-यांना आधी नोंदणी करावी लागणार आहे. त्यानंतर तुम्हाला मोबाइल अॅपच्या माध्यमातून परवानगी मिळणार आहे. नागरी उड्डाण मंत्री सुरेश प्रभू यांनी या निर्णयाची घोषणा केली आहे.