शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

हिमस्खलनात पाच जवान शहीद; काश्मीर खोऱ्यात १० जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2020 04:05 IST

बर्फवृष्टीने जम्मू-श्रीनगर महामार्गावर तीन हजार वाहने अडकली

श्रीनगर : काश्मीर खोºयातील बºयाच भागांत बर्फवृष्टीमुळे जनजीवन पूर्ण विस्कळीत झाले असून, सोमवारी रात्री खोºयात तीन ठिकाणी झालेल्या हिमस्खलनात १0 जण मरण पावले आहेत. मृतांमध्ये लष्कराचे चार जवान व बीएसएफचा एक जवान आणि पाच स्थानिक रहिवासीही आहेत. नौगाममध्येही बीएसएफचा एक जवान मरण पावला. त्याच्याबरोबर असलेल्या सहा जवानांची मात्र सुटका करण्यात आली.

माछिल क्षेत्रातील नियंत्रण रेषेपाशी सोमवारी रात्री हिमस्खलनात पाच जवान अडकले होते. त्यापैकी चौघे बर्फाखाली दबून मरण पावले, तर एकाची सुटका करण्यात आली. नौगाम भागातील नियंत्रण रेषेवरील हिमस्खलनात बीएसएफचे सात जवान अडकले होते. त्यापैकी एक जवान मरण पावला, तर सहा जवानांची सुटका करण्यात आली. गंदेरबल जिल्ह्यातही प्रचंड हिमस्खलन झाले. तिथे बर्फाच्या ढिगाºयाखाली ९ जण अडकले होते. त्यापैकी चार जणांची सुटका करण्यात आली. मात्र पाच स्थानिक मरण पावले.

जनजीवन विस्कळीतकाश्मीर खोºयाच्या बºयाच भागांत बर्फवृष्टीबरोबरच जोरदार पाऊसही सुरू आहे. प्रचंड धुके असून, त्याचा परिणाम विमानसेवेवर झाला. जम्मू-श्रीनगर मार्गावर बर्फवृष्टी, पाऊस व धुक्यामुळे तीन हजारांहून अधिक वाहने अडकून पडली आहेत. अनेक भागांत तापमान शून्याखाली आले आहे. मालवाहतूक करणारी वाहने न पोहोचल्याने अन्नधान्ये, भाज्या तसेच अन्य जीवनावश्यक वस्तूंची टंचाई भासत आहे. शाळा व महाविद्यालयांना अनेक ठिकाणी सुट्टी दिल आहे. खासगी, सरकारी कार्यालयांमध्येही उपस्थिती अत्यल्प होती. (वृत्तसंस्था)

लातूरचे जवान सुरेश चित्ते सियाचीनमध्ये शहीदआलमला (जि. लातूर) : औसा तालुक्यातील आलमला येथील जवान सुरेश गोरख चित्ते (३२) हे सियाचीन (जम्मू-काश्मीर) येथे कर्तव्य बजावत असताना मंगळवारी शहीद झाले. हे समजताच औसा तालुक्यावर शोककळा पसरली. सुरेश चित्ते लेह येथील सियाचीन भागात बटालियनमध्ये शिपाई पदावर कार्यरत होते. २००५मध्ये ते लष्करात भरती झाले. तब्बल १४ वर्षे ते सेवेत होते. वडिलांच्या निधनानंतर अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत सुरेश यांनी दोन बहिणींचे लग्न केले. भावालाही आधार दिला. त्यांची केवळ १ वर्षे ५ महिने सेवा बाकी होती़ सहा वर्षांपूर्वीच त्यांचे लग्न झाले होते. त्याच्या पश्चात पत्नी, दोन मुली, एक मुलगा, आई, भाऊ, दोन बहिणी असा परिवार आहे.

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीर