शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

मूकबधिरांच्या खाणाखुणांच्या भाषेला अधिकृत मान्यता द्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2018 00:56 IST

दिव्यांग हक्क कार्यकर्ते व ‘निपमॅन फाऊंडेशन’चे संस्थापक निपुण मल्होत्रा यांनी अ‍ॅड. जय देहाडराय यांच्यामार्फत ही याचिका केली आहे.

नवी दिल्ली : भारतातील मूकबधिर व्यक्ती ज्या खाणाखुणांच्या भाषेने परस्परांशी व इतरांशी संवाद साधतात त्या ‘इंडियन साईन लँग्वेज’ला अधिकृत भारतीय भाषेचा दर्जा देऊन तिचा समावेश राज्यघटनेच्या आठव्या परिशिष्टात करण्यात यावा, अशी एक महत्त्वपूर्ण जनहितयाचिका दिल्ली उच्च न्यायालयात आली आहे.दिव्यांग हक्क कार्यकर्ते व ‘निपमॅन फाऊंडेशन’चे संस्थापक निपुण मल्होत्रा यांनी अ‍ॅड. जय देहाडराय यांच्यामार्फत ही याचिका केली आहे. मुख्य न्यायाधीश न्या. राजेंद्र मेनन व न्या. व्ही. कामेश्वर राव यांच्या खंडपीठाने गेल्या आठवड्यात याचिकाकर्त्याचा प्राथमिक युक्तिवाद ऐकल्यानंतर केंद्र सरकारला चार आठवड्यांत उत्तर दाखल करण्यास सांगून पुढील सुनावणी ५ डिसेंबर रोजी ठेवली. याचिका म्हणते की, भारतात मूकबधिरांची संख्या १.८० कोटी आहे. हे लोक हाताने खाणाखुणा करून व चेहऱ्यावर भाव प्रदर्शित करून परस्परांशी व इतरांशी संवाद साधतात. देशात राज्यागणिक बोलीभाषा वेगळ्या असल्या तरी मूकबधिरांची देशव्यापी अशी एक वैशिष्ट्यपूर्ण सामायिक खाणाखुणांची भाषा विकसित झाली आहे. मात्र, अन्य भाषांप्रमाणे या भाषेला अधिकृत भाषेची मान्यता नसल्याने या लोकांना अनेक प्रकारच्या नोकरीच्या संधींपासून व नागरी सेवांच्या स्पर्धा परीक्षांपासून वंचित राहावे लागते.या भाषेचा राज्यघटनेच्या आठव्या परिशिष्टात समावेश करणे का गरजेचे आहे, हे विषद करताना याचिका म्हणते की, राज्यघटनेने प्रत्येक नागरिकास अभिव्यक्तीचा जो मूलभूत हक्क दिला आहे त्यात ठराविक भाषेतून संवाद साधण्याचा अधिकारही अंतर्भूत आहे. मूकबधिरांच्या भाषेला मान्यता दिल्याखेरीज त्यांचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य परिपूर्ण होणार नाही.३१ देशांची मान्यता : शिवाय समानता आणि सरकारकडून सर्वांना समान वागणूक या मूलभूत हक्कांसाठीही या भाषेला मान्यता देणे गरजेचे आहे. दिव्यांगांना समान संधी देऊन समाजाच्या मुख्य प्रवाहात सामील करून घेण्यासाठी केलेल्या कायद्यातही दिव्यांगस्नेही व्यवस्था निर्माण करण्याची जबाबदारी सरकारवर आहे, असेही याचिका म्हणते.आॅस्ट्रेलिया, आॅस्ट्रिया, बेल्जियम, ब्राझिल, कॅनडा, चिली, चेक प्रजासत्ताक, डेन्मार्क यासह ३१ देशांनी तेथील मूकबधिरांच्या खाणाखुणांच्या भाषेला अधिकृत भाषा म्हणून मान्यता दिली आहे, असेही न्यायालयाच्या निदर्शनास आणण्यात आले.