ऑस्ट्रेलिया डाव
By admin | Updated: December 27, 2014 18:54 IST
ऑस्ट्रेलियाचा धावडोंगर
ऑस्ट्रेलिया डाव
ऑस्ट्रेलियाचा धावडोंगरतिसरी कसोटी : स्मिथच्या १९२ धावांमुळे ५३० पर्यंत मजल; भारत १ बाद १०८ धावामेलबोर्न : कर्णधार स्टीव्हन स्मिथ याने सलग तिसरे शतक ठोकूृन भारतीय गोलंदाजीच्या उणिवा चव्हाट्यावर आणल्या. त्याने १९२ धावांची खेळी करताच ऑस्ट्रेलियाने तिसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावात ५३० पर्यंत मजल गाठली. भारतानेही चोख प्रत्युत्तर देत सुरेख खेळ केला. दुसऱ्या दिवसाचा खेळ थांबला त्यावेळी मुरली विजयच्या नाबाद अर्धशतकी खेळीच्या बळावर १ बाद १०८ अशी वाटचाल केली. भारत अद्याप ४२२ धावांनी मागे असून, विजय ५५ आणि चेतेश्वर पुजारा २५ धावांवर खेळत होते. शिखर धवन २८ धावा काढून बाद झाला. ऑस्ट्रेलियाने सकाळी ५ बाद २५९ वरून पुढे खेळ सुरू केला. स्मिथने सातव्या शतकासह १९२ धावा ठोकल्या. त्याने ब्रॅड हॅडिन(५५)सोबत सहाव्या गड्यासाठी ११० आणि रेयॉन हरिस(७४)सोबत आठव्या गड्यासाठी १०६ धावांची भागीदारी केली. तळाच्या फलंदाजांनीही उपयुक्त योगदान दिले. स्मिथ सात तास मैदानावर होता. त्याने ३०५ चेंडू खेळून १५ चौकार व २ षटकार हाणले. करियरमधील ही त्याची सवार्ेच्च खेळी ठरली.भारताकडून ईशांत शर्मा फ्लॉप ठरला. उमेश यादवने मात्र ३ गडी बाद केले. मोहम्मद शमी याने १३८ धावांत ४ गडी बाद केले. ऑफ स्पिनर रविचंद्रन अश्विनला १३४ धावांत ३ गडी बाद करता आले. दुसऱ्या सत्रात स्मिथ- हॅरिस जोडीने वेगाने धावा काढल्या. अखेर अश्विनने धावांना आवर घालत हॅरिसला बाद केले. भारताच्या डावात हॅरिसने धवनला बाद केले. धवनने स्लिपमध्ये स्मिथकडे सोपा झेल दिला. मुरली आणि पुजारा यांनी त्यानंतर कुठलीही जोखीम न पत्करता सावध धावा काढल्या. भारताला मालिका बरोबरीत सोडवायची झाल्यास हा सामना कुठल्याही स्थितीत जिंकावा लागेल. त्यासाठी मुरली-पुजारा यांना मोठी खेळावी करावी लागेल. यजमान संघ ज्या खेळपट्टीवर इतक्या मोठ्या धावा उभारतो, तेथे भारतीय फलंदाज धावा काढण्यात कुठवर बाजी मारतील, यावर भारताच्या विजयाचे समीकरण विसंबून असेल. (वृत्तसंस्था)