शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

‘नीट’ वटहुकुमाकडे लक्ष

By admin | Updated: May 24, 2016 04:38 IST

राज्य सरकारांच्या वैध चिंता दूर करण्यासाठीच नीट परीक्षेबाबत वटहुकुमाचा मार्ग अवलंबण्यात आल्याचा खुलासा केंद्रीय आरोग्यमंत्री जे.पी. नड्डा यांनी सोमवारी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची

नवी दिल्ली : राज्य सरकारांच्या वैध चिंता दूर करण्यासाठीच नीट परीक्षेबाबत वटहुकुमाचा मार्ग अवलंबण्यात आल्याचा खुलासा केंद्रीय आरोग्यमंत्री जे.पी. नड्डा यांनी सोमवारी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची भेट घेऊन केला. राष्ट्रपती मंगळवारी चीनच्या दौऱ्यावर जात असून, त्याआधी ते वटहुकुमावर सही करतील अशी शक्यता आहे. या वटहुकुमाकडे लाखो विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे.वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी राज्य सरकारांनी वेगळ्या परीक्षा घेतल्या असून, अभ्यासक्रमातील फरक तसेच परीक्षा प्रादेशिक भाषेत लिहिण्याचा पर्याय उपलब्ध नसणे यासारख्या प्रश्नांवर तोडगा काढणे आवश्यक होते. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाबाबत कोणत्याही प्रकारे संभ्रम नाही. सर्वपक्षीय बैठकीत राजकीय पक्षांनी व्यक्त केलेल्या मुद्द्यांवर तोडगा काढणे आवश्यक असल्याचे नड्डा यांनी यापूर्वीच स्पष्ट केले होते. (वृत्तसंस्था)खासगी महाविद्यालयांचे हित?केंद्र सरकारने विद्यार्थ्यांचे नव्हे तर खासगी महाविद्यालयांचे हित लक्षात घेत नीट परीक्षा वर्षभरासाठी टाळणारा वटहुकूम आणल्याचा आरोप काँग्रेस आणि आम आदमी पार्टीने केला आहे. नीट भाग-१ परीक्षा १ मे रोजी झाली असून भाग-२ परीक्षा २४ जुलै रोजी होणार आहे. वटहुकुमामध्ये यंदा नीटच रद्द करण्याचा उल्लेख असल्यास आणि राष्ट्रपतींनी त्यावर स्वाक्षरी केल्यास ही परीक्षा देण्याची गरज उरणार नाही.आरोग्य मंत्रालयाचे स्पष्टीकरणराज्यांना नीटच्या कक्षेबाहेर ठेवण्यासाठी वटहुकुमाचा आश्रय घ्यावा लागण्याचे कारण त्यांनी नमूद केले. राष्ट्रपतींनी वटहुकूम जारी करण्याबाबत आरोग्य मंत्रालयाला स्पष्टीकरण मागितले होते; सोबतच त्यांनी राष्ट्रपती भवनातील कायदेतज्ज्ञांचा सल्लाही मागितला होता. सर्व सरकारी महाविद्यालये, अभिमत विद्यापीठे आणि खासगी महाविद्यालयांसाठी नीट बंधनकारक करणारा आदेश या न्यायालयाने दिला होता. नव्या वटहुकुमामुळे त्याला काही प्रमाणात बगल दिली जाणार आहे.