शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताची प्रतिमा मलिन करण्याचे प्रयत्न- पंतप्रधान मोदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2022 09:29 IST

जगाला भारताची खरी ओळख करून देणे गरजेचे

नवी दिल्ली : भारताची प्रतिमा मलिन करण्याचे वेगवेगळे प्रयत्न सुरू आहेत. तुम्ही सर्व जण याचे साक्षीदार आहात. आंतरराष्ट्रीय स्तरावरही बरेच प्रयत्न चालू आहेत. हे निव्वळ राजकारण आहे, असे सांगून आपण यापासून दूर जाऊ शकत नाही. जगाला भारताची खरी ओळख करून देणे हे आपले कर्तव्य आहे, असे असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी केले.  माउंट अबू येथील बह्मकुमारीज संस्थानतर्फे आयाेजित कार्यक्रमात पंतप्रधान माेदींनी व्हर्च्युअल पद्धतीने सहभाग घेतला. त्यावेळी त्यांनी सांगितले, की भारताची प्रतिमा मलिन करण्याचे वेगवेगळे प्रयत्न सुरू आहेत. हे राजकारण नसून आपल्या देशाचा प्रश्न आहे. ब्रह्मकुमारीज संस्थानसारख्या अशा संस्था ज्यांचे आंतरराष्ट्रीय पातळीवर अस्तित्व आहे, त्यांनी जगासमाेर भारताची खरी प्रतिमा पाेहाेचवायला हवी. भारताबद्दल ज्या अफवा पसरविण्यात येत आहेत, त्यांचे सत्य जगासमाेर आणून आंतरराष्ट्रीय समुदायाला भारताबाबत जागरूक करावे, हे आपले सर्वांचे कर्तव्य आहे, असे माेदी म्हणाले. माेदींनी सांगितले, की आपण नवीन भाारताची निर्मिती करीत आहाेत. त्यात भेदभावाला कुठलीही जागा राहणार नाही. समानता व सामाजिक न्यायाच्या भक्कम पायावर उभा असलेला समाज आपण बनवीत आहाेत. या भारताचा विचार आणि दृष्टिकाेन पूर्णपणे नवा आहे. राष्ट्राच्या प्रगतीमध्येच आपली प्रगती आहे. राष्ट्रासाेबतच आपलेही अस्तित्व आहे. ही जाणीव या नव्या भारताच्या निर्मणामध्ये आपली सर्वांत माेठी शक्ती आहे, असे माेदी म्हणाले.महिलांचा गाैरवराणी चेन्नम्मा, मातंगिनी हाजरा, राणी लक्ष्मीबाई, कित्तूरच्या वीरांगना झलकारीबाईपासून ते अहिल्याबाई होळकर आणि सावित्रीबाई फुले यांनी सामाजिक क्षेत्रात भारताची अस्मिता जपली. जेव्हा जग गडद अंधारात होते, स्त्रियांबद्दल जुन्या विचारसरणीत अडकले होते, तेव्हा भारत माता शक्तीची देवीच्या रूपात पूजा करत असे. आमच्याकडे गार्गी, मैत्रेयी, अनुसूया, अरुंधती आणि मदालसा यासारख्या विद्वान स्त्रियांनी समाजाला ज्ञान दिले, अशा शब्दांमध्ये पंतप्रधान माेदींनी महिलांचा गाैरव केला.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी