शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
4
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
5
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!
6
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
7
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
8
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
9
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
10
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
11
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
12
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
13
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
14
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
15
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
16
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
17
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
18
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
19
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद

मोर्चा काढण्याच्या प्रयत्न, यासीन मलिकना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2017 01:37 IST

जम्मू अँड काश्मीर लिबरेशन फ्रंटचे अध्यक्ष मोहम्मद यासीन मलिक यांना रविवारी अटक करण्यात आली.

श्रीनगर : जम्मू अँड काश्मीर लिबरेशन फ्रंटचे अध्यक्ष मोहम्मद यासीन मलिक यांना रविवारी अटक करण्यात आली. काश्मीर खो-यात होत असलेल्या मानवाधिकारांच्या कथित उल्लंघनाच्या निषेधार्थ संयुक्त राष्ट्रांच्या येथील स्थानिक कार्यालयावर मोर्चा नेण्याचा त्यांनी प्रयत्न केला होता. मलिक येथील लाल चौकाजवळ पोहोचल्यावर त्यांनी सोनवार येथील युनायटेड नेशन्स मिलिटरी आॅब्झर्वर ग्रुप इन इंडिया अँड पाकिस्तान कार्यालयावर मोर्चा नेण्याचा प्रयत्न केला, असे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी मलिक यांना अटक करून मोर्चा काढू दिला नाही व त्यांना कोठी बाग पोलीस ठाण्यात नेले.मानवी हक्कांच्या उल्लंघनाच्या निषेधार्थ मलिक यांनी संयुक्त राष्ट्रांच्या कार्यालयावर मोर्चा नेण्याचे व व्यवहार बंद ठेवण्याचे आवाहन लोकांना गुरुवारी केले होते. १० डिसेंबर हा आंतरराष्ट्रीय मानवी हक्क दिन आहे. या दिवशी काश्मिरी लोक जॉइंट रेझिस्टन्स लीडरशिपच्या (जेआरएल) झेंड्याखाली पूर्णपणे व्यवहार बंद ठेवतील व मानवी हक्कांच्या उल्लंघनाच्या निषेधार्थ रात्री दिवे बंद ठेवतील, असे मलिक यांनी निवेदनात म्हटले होते. जेआरएलमध्ये सईद अली शाह गिलानी, मिरवैझ उमर फारूक आणि यासीम मलिक यांचा समावेश आहे.

टॅग्स :newsबातम्याJammu Kashmirजम्मू-काश्मीर