शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

सरदार पटेलांचे योगदान कमी दाखविण्याचा प्रयत्न झाला - पंतप्रधान मोदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2017 01:15 IST

स्वातंत्र्यानंतर देशाची एकजूट करण्याचे सरदार वल्लभभाई पटेल यांचे योगदान कमी करण्याचा आणि मिटविण्याचा प्रयत्न काही राजकीय पक्ष आणि सरकारांकडून झाला, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी येथे काँग्रेसवर हल्ला चढविला.

नवी दिल्ली : स्वातंत्र्यानंतर देशाची एकजूट करण्याचे सरदार वल्लभभाई पटेल यांचे योगदान कमी करण्याचा आणि मिटविण्याचा प्रयत्न काही राजकीय पक्ष आणि सरकारांकडून झाला, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी येथे काँग्रेसवर हल्ला चढविला.पटेल यांच्या १४२ व्या जयंतीनिमित्त मेजर ध्यानचंद स्टेडियम येथून सुरु झालेल्या ‘रन फॉर यूनिटी’ला त्यांनी हिरवा झेंडा दाखविला. राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू, पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी संसद मार्ग स्थित सरदार पटेल यांच्या प्रतिमेवर पुष्पांजली अर्पण केली. मोदी म्हणाले, देशाच्या पहिल्या गृहमंत्र्यांचा मुत्सद्दीपणा आणि राजकीय कौशल्यामुळे देश एकजूट आहे.पटेलांना कमी महत्व देण्याचे प्रयत्न झाले. जेणेकरुन त्यांचे योगदान विसरले जावे. पण, सरदार हे सरदार आहेत. भलेही सरकार अथवा कोणता राजकीय पक्ष त्यांचे योगदान स्वीकार करो अथवा ना करो राष्ट्र आणि येथील तरुण त्यांना विसरु शकत नाहीत.देशासाठी पटेलांचे जे योगदान आहे त्याचा भारतातील तरुण सन्मान करतात. मोदी म्हणाले की, स्वातंत्र्यानंतर आलेल्या संकटात सरदार पटेल यांनी देशाला वाचविले आणि देशाला एकजूट करण्यात सफलता मिळविली.ब्रिटीश सरकार भारताला लहान लहान राज्यात विघटित करु पाहत होते. पण, पटेल यांनी साम- दाम, दंड- भेद, राजनीती, कुटनीती यांचा उपयोग करुन एक राष्ट्र बनविण्यात ते यशस्वी झाले.‘रन फॉर यूनिटी’साठी कर्णम मल्लेश्वरी, दीपा करमारकर, सरदार सिंह आणि सुरेश रैना यांच्यासारख्या प्रख्यात खेळाडूंसह मोठ्या संख्येने लोकांनी कार्यक्रमात भाग घेतला. ‘रन फॉर यूनिटी’चा हा टप्पा दीड किमीचा म्हणजे इंडिया गेटपर्यंत होता.पटेलांच्या योगदानाला मान्यता मिळाली नाही : नायडूसरदार वल्लभभाई पटेल हे देशाला एका सूत्रात बांधणारे सूत्रधार होते. मात्र, त्यांच्या योगदानाला उपयुक्त मान्यता देण्यात आली नाही, असे मत उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी व्यक्त केले.नेहरु स्मारक संग्रहालयातील कार्यक्रमात ते बोलत होते. ते म्हणाले की, सरदार पटेल यांचे योगदान दुर्लक्षित करण्यात आले. देशातील ५६० संस्थानांचे विलिनीकरण हा त्यांचा महत्वपूर्ण निर्णय होता.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी