शहरं
Join us  
Trending Stories
1
पाटण्यात 'मोदी वादळ', पंतप्रधानांच्या रोड शोला 3.5 किलोमीटरपर्यंत प्रचंड गर्दी
2
वडील चोरले म्हणता...! 'लावा रे तो व्हिडीओ' म्हणत राज यांनी सुषमा अंधारेंची क्लिप दाखवली; उद्धव ठाकरेंवर जहरी टीका केली
3
RCB ने प्ले ऑफच्या आशा कायम राखल्या, DC च्या अडचणी वाढल्या; विराट-अनुष्का खूश 
4
"...तर इस्रायल दुसऱ्याच दिवशी गाझावरील हल्ले थांबवेल"! पण हमासला बायडेन यांची एवढी एक गोष्ट ऐकावी लागेल
5
"जरा एकमेकांकडे बघा, काय उद्योग केलेत?"; फोडाफोडीवरून राज यांचा उद्धव ठाकरें, शरद पवारांवर हल्लाबोल
6
चिखलीत व्यावसायिक स्पर्धेतून गोळीबार, एक जण गंभीर जखमी 
7
पुण्यात रवींद्र धंगेकराचं पोलीस ठाण्यातच ठिय्या आंदोलन; वाचा नेमकं काय घडलं?
8
निवडणूक बंदोबस्तासाठी आलेल्या अमरावतीच्या होमगार्डचा मृत्यू
9
२२ वर्षीय फलंदाज दुर्दैवीरित्या बाद झाला, विराट कोहली पाहा किती खूश झाला; Video 
10
Jio चा धमाका, आता 895 रुपयांच्या प्लॅनमध्ये मिळणार 11 महिन्यांची व्हॅलिडिटी
11
"फोडाफोडीच्या राजकारणाची सुरूवात शरद पवारांनी सुरू केली", राज ठाकरेंची टीका 
12
पश्चिम बंगालच्या संदेशखलीत पुन्हा राडा; TMC कार्यकर्त्याला महिलांनी बेदम चोपले
13
विराट कोहली अन् इशांत शर्मा यांच्यात धक्काबुक्की! Live Match मध्ये नेमके असं काय घडले?
14
'...तर मला पुन्हा तुरुंगात जाण्याची गरज नाही', CM अरविंद केजरीवालांचे जनतेला आवाहन
15
MS Dhoni भावनिक झाला! प्रेक्षकांना थांब म्हणणाऱ्या CSK ने बघा काय केले, सुरेश रैनाने मारली मिठी
16
विल जॅक्स, रजत पाटीदार यांच्या फटकेबाजीनंतरही RCB ची झाली कोंडी, DC चे कमबॅक 
17
तीन तलाक, मुस्लिम पर्सनल लॉ, राम मंदिर..; अमित शाह यांचे राहुल गांधींना 5 प्रश्न
18
ज्येष्ठ अभिनेते सतीश जोशी यांचं निधन, रंगभूमीवरच घेतला अखेरचा श्वास
19
संदेशखळी प्रकरण : NCW अध्यक्षा रेखा शर्मा यांच्याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार!
20
चेन्नई सुपर किंग्स प्ले ऑफच्या शर्यतीत कायम, वाढवले RCB चे टेंशन 

ज्योतिरादित्य शिंदेंवर जीवघेण्या हल्ल्याचा प्रयत्न; शिवराज सिंह चौहान यांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2020 12:39 PM

ज्योतिरादित्य शिंदे यांच्या गाडीवर हल्ला होऊ शकतो, तर सर्वसामान्यांच काय, असा सवाल चौहान यांनी उपस्थित केला. राज्याची स्थिती अत्यंत बिकट असून राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचे बारा वाजल्याची त्यांनी केली. 

नवी दिल्ली - राज्यसभा निवडणुकीचे उमेदवार ज्योतिरादित्य शिंदे यांच्या ताफ्यावर शुक्रवारी जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री आणि भाजपनेते शिवराज सिंह चौहान यांनी केला आहे. शहरातील कमला पार्क परिसरात ज्योतिरादित्य यांची गाडी रोखून दगडफेक केल्याचा दावा त्यांनी केला. मात्र पोलिसांनी हे आरोप फेटाळून लावले आहे.

ज्योतिरादित्य शिंदे यांना काळे झेंडे दाखवून त्यांच्यावर दगडफेक करण्याच्या प्रयत्नात असलेल्यांविरुद्ध गुन्हा दाखल कऱण्यासाठी भाजपचे स्थनिक नेते राजेंद्र गुप्ता, श्यामला पोलिस चौकीत दाखल झाले होते. यावर पोलिस अधिकारी बी.पी. सिंह यांनी सांगितले की, शिंदे यांना सांयकाळी सात वाजता काळे झेंडे दाखविण्याचा प्रयत्न झाला होता. त्यानंतर काही अज्ञात लोकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच भाजप नेत्यांकडून दगडफेक झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. मात्र दगडफेक झाली नाही, असं त्यांनी सांगितले. 

चौहान म्हणाले की, शिंदे यांच्या गाडी चालकाने कशीबशी गाडी तेथून काढली. ज्योतिरादित्य शिंदे यांच्या गाडीवर हल्ला होऊ शकतो, तर सर्वसामान्यांच काय, असा सवाल चौहान यांनी उपस्थित केला. राज्याची स्थिती अत्यंत बिकट असून राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचे बारा वाजल्याची त्यांनी केली.