आडनाव लावण्यावरुन विळ्याने केला हल्ला
By admin | Updated: March 27, 2016 00:45 IST
जळगाव: आम्ही पाटील आडनाव लावतो, तुम्ही लोहार का लावता? या कारणावरून रवींद्र साडू लोहार (वय ३४ मुळ रा.लोंजे, ता.चाळीसगाव ह.मु.कुसुंबा ता.जळगाव) यांच्यावर हिराबाई रतन कुढरे यांनी विळ्याने तीन ठिकाणी हल्ला केला, तर रेणुका रवींद्र लोहार व गीताबाई गजानन मराठे (सर्व रा. कुसुंबा) यांनी मारहाण करून जिवंत ठार मारण्याची धमकी दिली. ही घटना शनिवारी दुपारी दीड वाजता कुसुंब्यातील नवीन पाण्याच्या टाकीजवळ घडली. याप्रकरणी तिघांवर एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास संजय भोई करीत आहेत.