शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

हॉस्पिटलवर हल्ला; दोन पोलीस शहीद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2018 05:22 IST

पाकिस्तानच्या हल्ल्यात ४ जवानांना वीरमरण आल्याला २ दिवस होण्याआधीच, पाकिस्तानी अतिरेक्यांनी हॉस्पिटलमध्ये पोलिसांवर गोळीबार करून पलायन केले. या गोळीबारात दोघे पोलीस शहीद झाले आहेत. 

श्रीनगर : पाकिस्तानच्या हल्ल्यात ४ जवानांना वीरमरण आल्याला २ दिवस होण्याआधीच, पाकिस्तानी अतिरेक्यांनी हॉस्पिटलमध्ये पोलिसांवर गोळीबार करून पलायन केले. या गोळीबारात दोघे पोलीस शहीद झाले आहेत. अबू हनझूला उर्फ  नावेद या पाकिस्तानी अतिरेक्याला आधी अटक झाली होती. त्याला आरोग्य तपासणीसाठी मंगळवारी सकाळी महाराजा हरीसिंग रुग्णालयात आणले होते. तिथे आल्यावर त्याने एका पोलिसाच्या हातातील बंदूक खेचून घेतली आणि त्यातून अंदाधुंद गोळीबार केला. गोळीबारामुळे गोंधळ उडताच नावेद तेथून पळून गेला. या गोळीबारात एका पोलिसाला जागीच वीरमरण आले, तर दुसरा पोलीस संध्याकाळी मरण पावला.  काश्मीरमध्ये अटक केलेल्या ६ पाकिस्तानी नागरिकांना रुग्णालयात आणले होते. त्यापैकी नावेदला काही महिन्यांपूर्वी शोपिया जिल्ह्यातून अटक केली होती. त्याने भारतात घुसखोरी केल्याचा आरोप होता. नावेदचा शोध घेतला जात आहे. नावेदचा कोणत्या दहशतवादी संघटनेशी संबंध होता का? याचा तपासही सुरू आहे. मात्र, जैश-ए-महमदशी त्याचा संबंध होता, असे सांगण्यात येते. सुरक्षा दलांनी सोमवारी जैशच्या ५ दहशतवाद्यांना अटक केली. त्यांचा विविध बॉम्बफेकीच्या घटनांमध्ये सहभाग होता. (वृत्तसंस्था)>लष्करी तळावर ग्रेनेड फेकलेत्या आधी सोमवारी रात्री पुलवामा जिल्ह्यातील काकापोरा येथील राष्ट्रीय रायफल्सच्या लष्करी तळावर दहशतवाद्यांनी ग्रेनेड हल्ला केला. त्या हल्ल्यात जीवितहानी झाली नाही. हल्ला करून दहशतवादी पळून गेले. त्यांचा शोध पोलीस घेत असून, त्यासाठी लष्करानेही परिसर पिंजून काढायला सुरुवात केली आहे.  कसून शोध सुरू आहे.राष्ट्रीय रायफल्सच्या तळावर रात्री साडेआठच्या सुमारास दहशतवाद्यांनी ग्रेनेड हल्ला फेकले. जवानांनी लगेच त्यांच्या दिशेने गोळीबार केला, पण त्या आधीच ते पळून गेले. हा हल्लाही जैश-ए-महम्मदने केला होता. त्या संघटनेचा प्रवक्ता हसन शाहने आम्हीच हा हल्ला केला असून, त्यात राष्ट्रीय रायफल्सचे मोठे नुकसान झाल्याचा दावा केला आहे. >हाच तो पोलिसांवर गोळीबार करून पळून गेलेला अबू हनझूला उर्फ नावेद नावाचा पाकिस्तानी अतिरेकी.

टॅग्स :TerrorismदहशतवादJammu Kashmirजम्मू-काश्मीर