शहरं
Join us  
Trending Stories
1
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
2
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
3
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
4
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
5
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
6
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
7
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
8
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
9
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
10
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
11
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
12
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
13
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
14
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
15
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
16
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
17
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
18
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
19
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
20
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
Daily Top 2Weekly Top 5

अ‍ॅट्रॉसिटी कायद्यास देणार कवचकुंडले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2018 04:11 IST

दलित आणि आदिवासींचे आपणच खरे कैवारी आहोत आणि त्यांच्या हिताशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असा पक्का संदेश ठाम कृतीतून देण्याची तयारी मोदी सरकारने सुरू केली आहे.

नवी दिल्ली : दलित आणि आदिवासींचे आपणच खरे कैवारी आहोत आणि त्यांच्या हिताशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असा पक्का संदेश ठाम कृतीतून देण्याची तयारी मोदी सरकारने सुरू केली आहे. त्यासाठी अ‍ॅट्रॉसिटी कायद्याच्या फिर्यादीची शहानिशा केल्याखेरीज गुन्हा नोंदविण्यास व अटक करण्यास मज्जाव करणारा सर्वोच्च न्यायालयाचा निकाल निष्प्रभ करणारा वटहुकूम काढण्याखेरीज हा कायदा कोर्टाच्या कक्षेबाहेर ठेवण्यासाठी त्याला घटनात्मक कवचकुंडले चढविण्याचाही सरकारचा विचार आहे.मार्चमधील निकालाच्या फेरविचारासाठी सरकारने याचिका केली आहे. त्याचा निर्णय होईपर्यंत निकालास स्थगिती द्यावी, ही दोन वेळा केलेली विनंती न्यायालयाने अमान्य केली. आता १६ मेच्या सुनावणीत काय होते यावर सरकारची पुढील पावले अवलंबून असतील.सूत्रांनी सांगितले की, न्यायालयाने फेरविचारास नकार दिला तर वटहुकूम काढून अ‍ॅट्रॉसिटी कायदा पूर्वी होता तसा केला जाईल. हे पहिले पाऊल असेल. त्यानंतर हा कायदा राज्यघटनेच्या नवव्या परिशिष्टात समाविष्ट करण्यासाठी संसदेच्या पावसाळी अधिवेशनात विधेयक आणण्याची तयारी सरकार करीत आहे. तसे केले की या कायद्यास न्यायालयात आव्हान देता येणार नाही.काय आहे ९वे परिशिष्ट?या परिशिष्टात नव्या कायद्याचा समावेश करण्यासाठी घटनादुरुस्ती विधेयक मंजूर करून घ्यावे लागेल. सरकारचे बहुमत तर आहेच. शिवाय विरोधकही उघडपणे दलितविरोधी भूमिका घेणार नाहीत, या खात्रीने हे विधेयक मंजूर होण्याची सरकारला खात्री वाटते.ठरावीक कायदे न्यायालयाच्या कक्षेबाहेर ठेवून न्यायालयांनी अवैध ठरविले तरी त्यांची वैधता अबाधित ठेवण्याचा अधिकार राज्यघटनेच्या अनुच्छेद ३१-बी अन्वये सरकारला आहे.स्वातंत्र्यानंतर लगेच सरकारने भूमीसुधारणा कायदे केले. न्यायालयांनी ते अवैध ठरवून रद्द करण्यास सुरुवात केली. तेव्हा सन १९५१ मध्ये म्हणजे राज्यघटना लागू झाल्यानंतर पहिल्याच वर्षी घटनादुरुस्ती करून अनुच्छेद ३१ बी अंतर्भूत केले गेले.१९७३ पर्यंत या परिशिष्टात समाविष्ट असलेल्या कायद्यांना पूर्ण संरक्षण होते. मात्र, त्यावर्षी सर्वोच्च न्यायालयाने केशवानंद भारती प्रकरणात संसद राज्यघटनेचा मूळ ढाचा बदलू शकत नाही, असा निकाल दिला.