शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

मध्यम, कुटीर, लघु उद्योगासाठी तीन लाख कोटींचे विनातारण कर्ज; निर्मला सीतारामन यांची मोठी घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2020 21:45 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी जाहीर केलेल्या स्वावलंबी भारत योजना पॅकेजच्या पहिल्या भागाची माहिती अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली. पंतप्रधान मोदींनी एकूण २० लाख कोटींच्या पॅकेजची घोषणा केली होती. पुढील तीन दिवस या पॅकेजची माहिती देण्यात आली.

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वावलंबी भारत योजनेच्या एकूण २० लाख कोटी रुपयांच्या पॅकेजची घोषणा केली होती. यावर आज अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी तीनपैकी पहिल्या टप्प्यात मध्यम, कुटीर, लघु उद्योगासाठी तसेच कंत्राटदार, कर्मचाऱ्यांचा पीएफ आणि आयकर भरण्यासाठी मोठा दिलासा दिला आहे. आज जाहीर केलेल्या योजनांची एकूण आकडेवारी ही ५.९५ लाख कोटी रुपयांची आहे. 

पहिल्या लॉकडाऊनवेळी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी गरीब आणि १५००० पेक्षा कमी पगार असलेल्या नोकरवर्गासाठी १.७ लाक कोटींचे पॅकेज जाहीर केले होते. आज त्यांनी पंतप्रधान गरीब कल्याण योजनेतून केलेल्या कामाची माहिती दिली. तसेच १५ हजार पेक्षा कमी पगार असलेल्या कर्मचाऱ्यांचा कंपनी आणि कर्मचारी असा दोन्ही बाजुचा २४ टक्के पीएफ जुलै ते ऑगस्ट असा तीन महिने सरकारच भरणार असल्याचे जाहीर केले. याचबरोबर सीतारामन यांनी एमएसएमई सेक्टरसाठी तीन लाख कोटींचे विनातारण कर्जपुरवठा करणारे पॅकेज जाहीर केले. तसेच अन्य लघु उद्योग यामध्ये येण्यासाठी नियमावलीमध्येही बदल करण्यात आले आहेत. 

कुटीर आणि लघू उद्योगासाठी आज सहा योजना जाहीर करण्यात आल्या. तीन लाख कोटींच्या विनातारण कर्जाचा फायदा हा ४५ लाख उद्योगांना होणार आहे. तसेच या उद्योगांना १२ महिन्यांचा ईएमआय दिलासा मिळणार आहे. चार वर्षांच्या मुदतीसाठी हे कर्ज दिले जाईल, असे सीतारामन यांनी सांगितले. याचबरोबर अडचणीत असलेल्या एमएसएमईना २०००० कोटींचे पॅकेज देण्यात येणार आहे. याचा फायदा २ लाख उद्योगांना होणार आहे. तसेच चांगले काम करत असलेल्या उद्योगांच्या विस्तारासाठी फंड उभारण्यात येणार आहे, यातून ५०००० कोटी रुपये देण्यात येणार आहेत.

कर्जाच्या योजनेचा लाभ छोट्या उद्योगांना मिळावा यासाठी निकषही बदलण्यात आले आहेत. सूक्ष्म उद्योगासाठी 1 कोटींपर्यंतची गुंतवणूक आणि ५ कोटींची उलाढाल, लघू उद्योगासाठी 5 कोटींची गुंतवणूक आणि 10 कोटींची वार्षिक उलाढाल असणाऱ्या कंपन्या, मध्यम आकाराचे उद्योगासाठी 10 कोटींची गुंतवणूक आणि 20 कोटींची वार्षिक उलाढाल असणाऱ्या कंपन्यांनाही यामध्ये समाविष्ट केले आहे. देशातील एमएसएमईना प्रोत्साहन देण्यासाठी २०० कोटींपेक्षा कमी रकमेच्या निविदा भरण्यास जागतीक कंपन्यांना बंदी आणण्यात आली आहे. ही निविदा केवळ एमएसएमईच भरू शकणार आहेत. तसेच एमएसएमईंसाठी ई कॉमर्समध्ये सहभाग आणि सार्वजनिक उपक्रमात ज्या एमएसएमईचे पैसे अडकलेले आहेत त्यांना येत्या ४५ दिवसांत ते पैसे दिले जातील, अशी माहिती सीतारामन यांनी दिली. 

पीएफचे नियम बदललेपीएफ योगदानासाठी केंद्र सरकारने २५०० कोटी रुपये दिले आहेत. तसेच पुढील तीन महिन्यांसाठी कंपनी आणि कर्मचाऱ्यांचा पीएफचा वाटा आधी १२-१२ टक्के होता. तो आता १०-१० टक्के करण्यात आला आहे. कर्मचाऱ्यांनाही हातात पैसे हवे आहेत. तसेच कंपन्यांनाही पैसे हवे आहेत. यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे कंपन्यांकडे ६७५० कोटींचे भांडवल खेळते राहील. यातून सरकारी कंपन्यांना वगळण्यात आले आहे, असे सीतारामन यांनी सांगितले. 

वीज वितरण कंपन्यांना मोठी मदतडिस्कॉमला मोठ्या मदतीची गरज आहे. अन्यथा देशभरातील वीज निर्मिती ठप्प होईल. यामुळे या कंपन्यांना संकटातून बाहेर काढायचे आहे. यासाठी ९०००० कोटी रुपयांचे पॅकेज वीज वितरण कंपन्यांना देण्यात येणार आहे. एनबीएफसीसाठी ४५००० कोटी रुपयांचे खेळते भांडवल उपलब्ध करून दिले जाणार आहे. तसेच गैर बँकिंग कंपन्या एपएफसी आणि एमएफआयसाठी 30,000 कोटी रुपयांची उधार घेण्याची सुविधा देण्यात आली आहे. कंत्राटदारांचा कामे पूर्ण करण्याचा कालावधी ६ महिन्यांनी वाढविण्यात येणार आहे. बँकांना या रेल्वे, रस्ते किंवा अन्य सरकारी कामांच्या कंत्राटदारांना पैसे देण्यासाठी सूचना देण्यात येणार आहेत. 

टीडीएसमध्ये कपात टीडीएस, टीसीएस दरात २५ टक्क्यांची कपात करण्यात आली आहे. ही कपात ३१ मार्च २०२१ पर्यंत राहणार आहे. यामुळे ५०००० कोटी रुपयांचा थेट फायदा कंपन्यांना होणार आहे.

 आयकरमध्ये दिलासाआयकर विभागाकडून संस्था, कंपन्यांचे रिफंड देण्यात येणार आहेत. तसेच आयकर भरण्याची मुदत ३० नोव्हेंबरपर्यंत वाढविली आहे. तसेच ३१ मार्चची मुदत 31 जुलै २०२१ पर्यंत वाढविण्यात आली आहे. तसेच ज्या कंपन्या, नागरिकांचा कर परतावा मिळालेला नाही त्यांना तो लगेचच दिला जाणार आहे. लॉकडाऊनमध्ये १८००० कोटी रुपयांचा परतावा देण्यात आला आहे. याचा १४ लाख करदात्यांना फायदा मिळाला आहे.

टॅग्स :Nirmala Sitaramanनिर्मला सीतारामनNarendra Modiनरेंद्र मोदी