शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

कोणत्याच एटीएममध्ये यापुढे नसतील दोन हजारांच्या नोटा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2020 07:04 IST

एप्रिलपासून सुरुवात होणार

नवी दिल्ली : इंडियन बँकेपाठोपाठ आता सर्वच बँकांच्या एटीएममधून दोन हजार रुपये मूल्याच्या नोटा बंद होणार आहे. त्याऐवजी १०० रुपये ते ५०० रुपये मूल्याच्या नोटा एटीएममध्ये मिळतील. त्यामुळे ग्राहकांना मोठाच दिलासा मिळणार आहे.आपल्या सुमारे ४० हजार एटीएममध्ये दोन हजार रुपयांच्या नोटा न ठेवण्याचा निर्णय इंडियन बँकेने आधीच घेतला आहे. त्याची अंमलबजावणी १ मार्चपासून होणार आहे. एटीएममधून दोन हजार रुपयांच्या नोटा मिळाल्यावर त्याचे सुटे करण्यासाठी ग्राहकांना खूप वणवण करावी लागते. अनेकदा ते बँकेत सुटे घेण्यासाठी येतात. त्यात फार वेळही जातो. त्यामुळे आम्ही दोन हजार रुपयांच्या नोटा आमच्या एटीएममध्ये ठेवणार नाही, असे इंडियन बँकेने जाहीर केले होते.आता देशभरातील सुमारे २ लाख ४0 हजार एटीएममध्येही दोन हजार रुपयांच्या नोटा नसतील. तिथेही १०० रुपये, २०० रुपये व ५०० रुपये या मूल्याच्या नोटाच उपलब्ध होतील. प्रत्येक एटीएममध्ये चार ट्रे असतात. त्यापैकी एका ट्रेमध्ये दोन हजार रुपयांच्या नोटा ठेवण्यात येत असत. पण यापुढे तो रिकामाच राहील. हे सारे होण्यासाठी किमान १ महिना जाईल, असा अंदाज आहे.छपाई सुरू की बंद?पंतप्रधान मोदी यांनी तीन वर्षांपूर्वी ५०० व १००० रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय घेतल्यानंतर लोकांना रोख रकमेची टंचाई भासू नये, म्हणून दोन हजार रुपयांच्या नोटा चलनात आणण्यात आल्या. पण, मोठ्या रकमेचे सुटे वा मोड मिळण्यास अडचणी येत असल्याच्या तक्रारी तेव्हापासून सुरूच होत्या.

टॅग्स :atmएटीएम