शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

अटलबिहारी वाजपेयी भारतरत्नने सन्मानित

By admin | Updated: March 27, 2015 21:19 IST

उत्कृष्ट वक्ता, अजातशत्रू, व कविमनाचे नेते म्हणून ओळखले जाणारे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना आज भारतरत्न या सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. २७ - उत्कृष्ट वक्ता, अजातशत्रू व कविमनाचे नेते म्हणून ओळखले जाणारे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना आज भारतरत्न या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी प्रोटोकॉल मोडून वाजपेयी यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांना हा पुरस्कार प्रदान केला. 

गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी व मदन मोहन मालवीय यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर झाला होता. आज दिल्लीत वाजपेयी यांच्या निवासस्थानी त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. लोकप्रिय नेत्याला सन्मानित करण्यासाठी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी हे राजकीय शिष्टाचार मोडून संध्याकाळी साडे चारच्या सुमारास वाजपेयींच्या निवासस्थानी पोहोचले. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री राजनाथ सिंह व वाजपेयी यांचे जवळचे नातेवाईक अशा मोजक्या मंडळींच्या उपस्थितीत वाजपेयी यांना भारतरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला. वाजपेयी यांनी त्यांचे संपूर्ण जीवन राष्ट्राला समर्पित केले, या ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार झालो हे माझे भाग्यच आहे असे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितले. राष्ट्रपतींनी वाजपेयी यांच्या निवासस्थानी जाऊन हा पुरस्कार दिला यासाठी मी त्यांचा आभारी आहे असे मोदींनी सांगितले.
 
अजातशत्रू वाजपेयींची कारकिर्द
५ डिसेंबर १९२४ साली ग्वाल्हेर येथे जन्मलेले वाजपेयी हे भारतीय जनसंघाच्या संस्थापकांपैकी एक आहेत.  त्यांनी तीन वेळा पंतप्रधानपद भूषवले आहे. अणू चाचणी करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेत त्याची अमलबजावणी करण्याचे कामही त्यांनी केले. तसेच दिल्ली-लाहोर दरम्यान बससेवा सुरू करून भारत- पाकिस्तानचे संबंध सुधारण्याचाही त्यांनी प्रयत्न केला. उत्कृष्ट वक्ता आणि कवि मनाचा नेता अशी ओळख असलेल्या वाजपेयी यांनी त्यांच्या वक्तृत्त्व कौशल्याने अनेकांची मने जिंकली. काँग्रेस व अन्य विरोधी पक्षातील नेत्यांशीही वाजपेयी यांचे चांगले संबंध होते.संसदेत वाजपेयी यांच्या अभ्यासपूर्ण भाषणांवर विरोधकांनीही दाद दिली आहे. संघाच्या तालमीत घडलेले वाजपेयी हे धर्मनिरपेक्ष नेते म्हणून प्रसिद्ध आहेत हेेदेखील एक वैशिष्ट्यच म्हणावे लागेल.