शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

गोव्यातील खगोलशास्त्रज्ञाने लावला कृष्णविवराचा शोध!, नासाची मान्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2017 03:06 IST

नासाच्या (एनएएसए) अवकाशातील हबल दुर्बिणीच्या (हबल स्पेस टेलेस्कोपच्या) साहाय्याने गोव्याचे पुत्र अािण खगोलशास्त्रज्ञ डॉ. विठ्ठल तिळवी यांनी सर्वात दूरवरील कृष्णविवराचा (ब्लॅक होलचा) शोध लावला आहे.

पणजी : नासाच्या (एनएएसए) अवकाशातील हबल दुर्बिणीच्या (हबल स्पेस टेलेस्कोपच्या) साहाय्याने गोव्याचे पुत्र अािण खगोलशास्त्रज्ञ डॉ. विठ्ठल तिळवी यांनी सर्वात दूरवरील कृष्णविवराचा (ब्लॅक होलचा) शोध लावला आहे. हे कृष्णविवर पृथ्वीपासून १३ दशकोटी प्रकाशवर्षे एवढ्या अंतरावर आहे.कृष्णविवराच्या प्रचंड गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे त्यातून कोणतीही गोष्ट बाहेर पडू शकत नाही. अगदी प्रकाशसुद्धा त्याच्या गुरुत्वाकर्षणामुळे खेचला जातो. त्यामुळेच त्यांचा शोध लावणे कठीण असते. पण आधुनिक तंत्राचा वापर करून आपण कृष्णविवरांचा शोध घेऊ शकतो, असे डॉ. तिळवी यांनी सांगितले.अनेक तारामंडळांच्या मध्यभागी कृष्णविवरे असतात; आकाशगंगेच्या मध्यभागीही कृष्णविवर आहे, असेही ते म्हणाले. या शोधाची माहिती आंतरराष्टÑीय जर्नल ‘अ‍ॅस्ट्रोफिजिकल जर्नल लॅटर्स’मध्ये प्रकाशित झाली आहे. २०१३ मध्ये डॉ. तिळवी यांच्या संशोधन पथकाने ब्रह्मांडात सर्वात दूरवर असलेल्या तारामंडळाचा शोध लावला होता. आता हबल दुर्बिणीच्या सहाय्याने अािण ‘स्पॅक्ट्रोस्कोपी’चा (घटक शोधण्याचे एक खास तंत्र) वापर करून अमेरिका अािण युरोपमधील खगोल शास्त्रज्ञांच्या मदतीने डॉ. तिळवी यांनी तारामंडळात एका खास किरणांचा शोध लावला आहे. ही किरणे सामान्यत: कृष्णविवरातच तयार होतात. आकाशगंगेसारख्या तारामंडळांची निर्मिती अािण ब्रह्मांडाची रचना कशी झाली, याच्या शोधासाठी ते अत्यंत महत्त्वाचे ठरेल, असे डॉ. तिळवी यांनी सांगितले.कृष्णविवराची पुष्टी आणि तपशीलवार माहिती मिळविण्यासाठी नासाने नुकतीच परवानगी दिली़कृष्णविवराची पुष्टी आणि तपशीलवार माहिती मिळवण्यासाठी नासाने डॉ़ तिळवी यांच्या नेतृत्त्वाखालील नवीन प्रकल्पाला नुकतीच मान्यता दिली आहे़नवीन निरीक्षणाने या कृष्णविवराची पुष्टी झाल्यास सर्वात दूरवरचे अर्थात ब्रम्हांडाच्या निर्मितीनंतरचे सर्वात पहिले कृष्णविवर म्हणून याची नोंद होईल, असे डॉ़ तिळवी म्हणाले़