शहरं
Join us  
Trending Stories
1
धुळ्यात विधानसभेला 45 हजार बोगस मतदारांचे मतदान; अनिल गोटेंकडे यादीच, गंभीर आरोप
2
डिझेलवाले सुटले...? नाही, पेट्रोलसारखेच इथेनॉल मिसळायचे होते, पण...; नितीन गडकरींच्या मनात चाललेय तरी काय...
3
जगातील ५० इस्लामिक देश एकटवणार; पहिल्यांदाच 'असं' काही घडणार, अमेरिकेची चिंता वाढली
4
भारताला लाल डोळे दाखवणाऱ्या चीनची अर्थव्यवस्था कोलमडली? लोकं पैसे खर्च करायलाच तयार नाही
5
Viral Video : 'ओ काका ही ट्रेन किती अ‍ॅवरेज देते?'; तरुणाच्या प्रश्नावर लोकोपायलटने दिले भन्नाट उत्तर! म्हणाले... 
6
Video: "इरफान... प्रामाणिक राहा..."; IND vs PAK सामन्यानंतर गौतम गंभीर कॅमेऱ्यासमोर असं का बोलला?
7
गर्भवतीची प्रसुती होत असताना प्रसुतीगृहातच एकमेकींशी भिडल्या इंटर्न डॉक्टर, त्यानंतर...  
8
सुपर मॉम! २६ दिवसांच्या लेकीला कुशीत घेऊन दिला इंटरव्ह्यू; आता झाली DSP, पतीने दिली साथ
9
अनंत अंबानी यांच्या वनताराला क्लीनचिट; जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रकरण?
10
ओप्पोचा मोठा धमाका! जबरदस्त फीचर्ससह ३ फोन केले लॉन्च; जाणून घ्या किंमत
11
हवाई दलात इंजिनिअर लोकेश बहिणीच्या घरी आला आणि अचानक २४व्या मजल्यावरून मारली उडी
12
सत्तापालटाच्या अवघ्या ३ दिवसांत नेपाळच्या Gen Z आंदोलकांमध्ये असंतोष; सुशीला कार्कींच्या घराबाहेर निदर्शने!
13
पाकिस्तानला धूळ चारल्यानंतर सूर्यकुमार यादवचं पत्नीसोबत जंगी सेलिब्रेशन, पाहा खास फोटो
14
Astro Tips: घर, प्लॉट विक्रीसाठी सगळे उपाय करून पाहिले? तरी निराशा? करा 'हा' प्रभावी तोडगा!
15
मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी शिंदेसेनेला धक्का? १५ माजी नगरसेवक नाराजीची चर्चा
16
Acharya Devvrat: आचार्य देवव्रत यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून घेतली शपथ 
17
घाव भर गया है! परेश रावल यांचं 'हेरा फेरी ३'वर भाष्य, दिग्दर्शकासोबतचं नातं बिघडलं? म्हणाले...
18
४०% पार्ट्स होणार स्वस्त! सर्व्हिसिंगच्या बिलातही दिलासा; GST कपातीनंतर सोपा होणार कार-बाईकचा मेंटेनन्स
19
पाकिस्तान फायनलमध्ये हवीय...! प्लीज भारताने पुढला सामना बॉयकॉट करावा; पाकिस्तानी चाहत्यांची मागणी
20
"...तर माझ्या वडिलांचा जीव वाचला असता"; नवजोत सिंग यांच्या मुलाने केला गंभीर आरोप

Corona Vaccine: देशात लवकरच लसीकरण सुरू होणार; जाणून घ्या, सीरमच्या लसीची किंमत किती असणार

By कुणाल गवाणकर | Updated: December 31, 2020 14:21 IST

Corona Vaccine: देशात लवकरच कोरोना लसीकरणास सुरुवात होण्याची शक्यता

नवी दिल्ली: देशातील कोरोना रुग्णांची संख्या १ कोटींच्या पुढे गेली आहे. गेल्या काही दिवसांपासून देशात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला आहे. दररोज आढळून येत असलेल्या कोरोना रुग्णांची संख्या २० ते २५ हजारांच्या आसपास आहे. तर कोरोनावर मात केलेल्यांची संख्या त्याहून अधिक आहे. देशाचा रिकव्हरी रेट ९६ टक्क्यांच्या पुढे गेला आहे. तर मृत्यूदर १.४५ टक्के इतका आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदींनी थोड्याच वेळापूर्वी गुजरातच्या राजकोटमधील एम्स रुग्णालयाचं भूमिपूजन केलं. त्यावेळी बोलताना त्यांनी देश जगातील सर्वात मोठ्या लसीकरणासाठी सज्ज असल्याचं म्हटलं. त्यामुळे नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच सरकारकडून कोरोना लसीला मंजुरी दिली जाईल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. ब्रिटन सरकारनं कालच ऑक्सफर्ड (Oxford) ऍस्ट्रा झेनेकाच्या (Astra Zeneca) लसीच्या वापरास परवानगी दिली. ब्रिटनच्या नियामक यंत्रणेकडून ऑक्सफर्ड ऍस्ट्रा झेनेकाच्या लसीला परवानगी मिळाल्यानंतर भारतात या लसीच्या वापरास मंजुरी देण्याचा विचार मोदी सरकारकडून सुरू होता. आता ब्रिटननं ऑक्सफर्ड ऍस्ट्रा झेनेकाच्या लसीच्या वापरास परवानगी दिल्यानंतर केंद्र सरकारदेखील लसीच्या वापरास मंजुरी देऊ शकतं.ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवा स्ट्रेन आढळून आल्यानं जगभरात चिंतेचं वातावरण आहे. मात्र ऑक्सफर्ड ऍस्ट्रा झेनेकाची लस कोरोनाच्या नव्या स्ट्रेनवर परिणामकारक ठरू शकणार आहे. मात्र पहिल्या आणि दुसऱ्या डोजमध्ये अंतर आवश्यक आहे. दोन डोजमध्ये दोन महिन्यांचं अंतर राखल्यास लस परिणामकारक ठरू शकते. कोरोना लसीच्या एका डोजची किंमत २०० रुपये आहे. त्यामुळे दोन डोजचा खर्च ४०० रुपये असेल. मात्र हा दर केवळ सरकारसाठी असेल, अशी माहिती सीरमनं दिली आहे. एखाद्या खासगी कंपनीनं लस खरेदी केल्यास त्यासाठी सीरम प्रति डोजमागे १ हजार रुपये आकारेल. कोविशील्ड लस मार्च-एप्रिल दरम्यान बाजारात उपलब्ध होईल.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या