शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

लघुग्रह १९ हजार किलोमीटर वेगाने पृथ्वीजवळून निघून गेला

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2020 05:25 IST

सुमारे मैलाच्या आकाराचा लघुग्रह पृथ्वीपासून फक्त ३.९ दशलक्ष किलोमिटर अंतरावरून गेला. हे अंतर सुमारे पृथ्वी आणि चंद्रांमधील अंतराच्या १६ पट इतके होते.

नवी दिल्ली : बुधवारी सकाळी (अमेरिकन वेळेनुसार १०.५६ वाजता) अंतराळात अनोखी घटना घडली. सुमारे मैलाच्या आकाराचा लघुग्रह पृथ्वीपासून फक्त ३.९ दशलक्ष किलोमिटर अंतरावरून गेला. हे अंतर सुमारे पृथ्वी आणि चंद्रांमधील अंतराच्या १६ पट इतके होते. मात्र ५२७६८ किंवा १९९८ आरओ २ या नावाने ओळखला जाणारा हा लघुग्रह या शतकात पृथ्वीच्या आणखी जवळून जाईल, असेही नासाने म्हटले.हा लघुग्रह २०७९ मध्ये पुन्हा पृथ्वीच्या जवळ येणार आहे. त्याच्या कक्षेसंदर्भात अभ्यास करण्यासाठी खगोलशास्त्रज्ञांना ही घटना मोठी पर्वणी होती. या लघूग्रहाचे वर्गीकरण धोकादायक या गटात करण्यात असले तरी सध्या यापासून पृथ्वीला कोणताही धोका नसल्याचेही शास्त्रज्ञांनी स्पष्ट केले आहे.आॅस्ट्रेलियातील नॅशनल युनिर्व्हसिटीमधील खगोलशास्त्रज्ञ डॉ. बॅ्रड टकर म्हणाले,‘या लघूग्रहापासून पृथ्वीला कोणताही धोका नाही. हा लघूग्रह पृथ्वीवर आदळणार नाही. ही एक अशी आपत्ती आहे की जी पृथ्वीवर होणार नाही.’ ते म्हणाले, ‘हा मोठा असला तरी पृथ्वीवरून डायनासोर्सला नष्ट करणाऱ्या अ‍ॅस्ट्रॉईडपेक्षा लहानच आहे.५०० फुटांपेक्षा मोठा आणि पाच दशलक्ष मैलापेक्षा कमी अंतरावरून जाणाºया कोणत्याही गोष्टीला ‘धोकादायक’ या गटात घातले जाते.प्युर्टो रिको येथील डॉ. अ‍ॅने व्रिकी या लघूग्रहाचा अभ्यास करत आहेत. ते म्हणाले,‘धोकादायक लघूग्रहाचा अभ्यास करण्यासाठी व त्यापासूनचा धोका कमी करण्यासाठीचे तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी या घटनेची मदत होऊ शकेल.’ या लघूग्रहाचा अभ्यास करणारे शास्त्रज्ञ गमतीने म्हणाले की ‘या उपग्रहाच्या छायाचित्रातून असे दिसते की त्याने मास्क परिधान केलेला आहे.’ दशकातील महत्वाच्या घटनेसंदर्भातील सर्व दहा छायाचित्रे नासाने प्रसारित केली आहेत.>59 वर्षे या अनोख्या घटनेचा अभ्यास करण्यासाठी वैज्ञानिकांना वाट पाहावी लागणार आहे. डॉ. व्रिक्की म्हणाले, ‘ओआर २ वरील एका टोकाकडे छोट्या टेकड्या दिसतात.मात्र आपण सर्वजण कोविड १९ या महामारीला तोंड देत असल्यामुळे आपल्याला ते मास्क लावल्यासारखे दिसते.खगोलीय घटनांचा अभ्यास करणारे शास्त्रज्ञ फ्लावियान व्हेनडिटी म्हणाले,‘राडारवरुन घेण्यात आलेल्या मोजमापांमुळे भविष्यात अशा पृथ्वीजवळ येणाºया लघू ग्रहासंदर्भातील अभ्यास करण्यासाठी आपल्याला अधिक माहिती मिळू शकेल.