नवी दिल्ली : पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू, केरळ ही चार राज्ये आणि पुदुचेरी या केंद्रशासित प्रदेशातील विधानसभा निवडणुका एप्रिल महिन्यात विविध तारखांना होऊ शकतात. त्या निवडणुकांचा कार्यक्रम मार्चच्या मध्यात निवडणूक आयोग जाहीर करण्याची शक्यता आहे, अशी माहिती सूत्रांनी मंगळवारी दिली. त्यापैकी पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळमधील विधानसभा निवडणुकांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
निवडणूक आयोगाने संबंधित राज्यांचा दौरा सुरू केला असून, मतदानाच्या तयारीचा आढावा घेण्यात येत आहे. आयोगाचे पथक सध्या आसाममध्ये आहे. विधानसभा निवडणूक होऊ घातलेल्या पुदुचेरीने एसआयआर प्रक्रियेंतर्गत १४ फेब्रुवारी रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली.
आसाममध्ये एसआयआरऐवजी ‘विशेष पुनरावलोकन’ प्रक्रिया राबविण्यात आली होती. या राज्याची अंतिम मतदार यादी १० फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध करण्यात आली. केरळ, पश्चिम बंगालची अंतिम मतदारयादी अनुक्रमे २१ फेब्रुवारी, २८ फेब्रुवारी रोजी येईल.
कधी संपतोय विधानसभांचा कार्यकाळ?
आसाम २० मे २०२६
केरळ २३ मे २०२६
तामिळनाडू १० मे २०२६
प. बंगाल ७ मे २०२६
पुद्दुचेरी १५ जून २०२६
याआधी किती टप्प्यांत झाले होते मतदान?
पश्चिम बंगाल ८
आसाम २
तामिळनाडू १
केरळ १
पुद्दुचेरी १
पाच कर्मचाऱ्यांविरोधात एफआयआर दाखल
एसआयआर प्रक्रियेवेळी मतदार यादी दुरुस्तीत गंभीर त्रुटी, तसेच डेटा सुरक्षा धोरणांचे उल्लंघन केल्याप्रकरणी पश्चिम बंगाल सरकारने दोन ईआरओ आणि दोन एईआरओसह पाच राज्य सरकारी कर्मचाऱ्यांविरोधात मंगळवारी एफआयआर नोंदवले. त्यांच्या विरोधात कारवाईचे आदेश निवडणूक आयोगाने सहा महिन्यांपूर्वी दिले होते.
Web Summary : West Bengal, Assam, Tamil Nadu, Kerala, and Puducherry will hold assembly elections in April. The Election Commission is likely to announce the schedule in mid-March. All eyes are on West Bengal, Tamil Nadu, and Kerala. Final voter lists are being prepared.
Web Summary : पश्चिम बंगाल, असम, तमिलनाडु, केरल और पुदुचेरी में अप्रैल में विधानसभा चुनाव होंगे। चुनाव आयोग द्वारा मार्च के मध्य में कार्यक्रम घोषित किए जाने की संभावना है। सबकी निगाहें पश्चिम बंगाल, तमिलनाडु और केरल पर टिकी हैं। अंतिम मतदाता सूची तैयार की जा रही है।