नवी दिल्ली: Assembly Election Result 2023 Live : मिझोराम वगळता मध्य प्रदेश Madhya Pradesh , राजस्थान Rajasthan , छत्तीसगड आणि तेलंगणा या चार राज्यांत आज मतमोजणी होणार आहे. निवडणूक आयोगाकडून तयारी पूर्ण झाली असून थोड्याच वेळात मतमोजणीला सुरुवात होणार आहे. या निकालाकडे उमेदवार, मतदारांसह संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे.
विधानसभा निवडणुकीच्या निकालापूर्वी आमदारांना वाचवण्यासाठी रिसॉर्टचे राजकारण सुरू झाले आहे. भाजपा आणि काँग्रेस दोघेही सक्रिय दिसत आहेत. राजस्थान असो वा तेलंगणा, काँग्रेस पक्षाला आपले आमदार फोडू द्यायचे नाहीत. त्यासाठी इतर राज्यातील त्यांचे कार्यकर्ते आणि नेतेही सक्रिय आहेत.
राजस्थान विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होण्यापूर्वी काँग्रेस पक्षाने उमेदवारांसाठी सूचना जारी केल्या आहेत. सर्व विजयी उमेदवारांनी सोमवारी दुपारी १२ वाजेपर्यंत जयपूरला पोहोचावे, असे सांगण्यात आले आहे. मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी शनिवारी उमेदवारांसोबत बैठक घेतली होती. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.
सध्याची स्थिती
राजस्थान - कॉंग्रेस - अशोक गेहलोतमध्य प्रदेश - भाजप - शिवराज सिंह चौहानछत्तीसगड - कॉंग्रेस - भूपेश बघेलतेलंगणा - बीआरएस - के. चंद्रशेखर राव