शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

Assembly Election: सत्ताधाऱ्यांविरुद्ध जनमत, तरीही मतदारांसमोर नाही स्पष्ट पर्याय

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2022 06:29 IST

गोवा, पंजाब आणि उत्तराखंड या तुलनेने लहान राज्यांत आश्चर्यकारक निकालाची चर्चा अराजकीय वर्तुळात सुरूही झाली आहे. 

- व्यंकटेश केसरी नवी दिल्ली : पंजाब, गोवा, उत्तराखंड आणि उत्तर प्रदेशमध्येही बहुरंगी लढती आणि सत्ताधाऱ्यांविरोधात जनमत असले तरी मतदारांना स्पष्ट पर्याय उपलब्ध नाही. गोवा, पंजाब आणि उत्तराखंड या तुलनेने लहान राज्यांत आश्चर्यकारक निकालाची चर्चा अराजकीय वर्तुळात सुरूही झाली आहे. राजकीय खेळाडू हे या राज्यांत पक्ष सोडून जाणाऱ्यांना प्रोत्साहन देत असल्यामुळे त्यातून त्यांचे पक्ष ही निवडणूक कार्यक्रम आणि कार्यकर्त्यांवर विसंबून जिंकू शकत नाही हेच मान्य करीत आहेत. पंजाबमध्ये काँग्रेस ३० टक्के अनुसूचित जातींची मते व दलित मुख्यमंत्री चरणजित सिंग चन्नी यांच्यावर विसंबून राहणार असेल, तर हिंदू आणि शीख मतदार दुखावले जाणार आहेत. आम आदमी पक्षाकडे (आप) निष्ठावंत कार्यकर्ते नाहीत. त्यामुळे किसान फ्रंट ‘आप’च्या मतांत फूट पाडू शकेल. काँग्रेस पक्षाच्या आमदारांची निवड ही पक्षनिष्ठा आणि गट समित्यांनी केलेल्या शिफारशींवरून केलेली असल्यामुळे ते पक्ष सोडून जाणार नाहीत अशा आत्मविश्वास ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी व्यक्त केला. काँग्रेसच्या आमदारांना फोडल्यानंतर तृणमूल काँग्रेस आता निवडणुकीच्या आधी युतीसाठी आग्रही आहे. ममता बॅनर्जी यांच्याकडून स्पष्ट प्रस्ताव आलेला नाही, असे चिदंबरम म्हणाले. गोवा काँग्रेस अशा युतीविरोधात आहे. कारण पंजाब आणि उत्तराखंडमध्ये ‘आप’ काँग्रेसविरोधात लढत आहे. तिसऱ्यांदा भाजप?भाजपविरोधातील पक्षांत होणारी मतविभागणी भाजपला तिसऱ्यांदा सत्ता देऊ शकेल का? भाजपदेखील बळकट नाही हे विशेष. उत्तराखंड अस्तित्वात आल्यापासून दिवंगत एन. डी. तिवारी वगळता एकाही मुख्यमंत्र्याला ५ वर्षे पूर्ण करता आलेले नाहीत. भाजप उत्तर प्रदेशातील निवडणूक ही रामराज्य विरुद्ध गुंडा राज असल्याचे सांगत आहे.मित्रपक्ष बनले भाजपला तापपाटणा : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीमुळे बिहारमधील राजकीय वर्तुळात वातावरण तापले आहे. उत्तर प्रदेशमध्ये राजकीय स्थान मिळवण्यासाठी भाजपच्या सहयोगी पक्षांतील अस्वस्थता स्पष्ट दिसत आहे. जनता दल (संयुक्त), विकासशील इन्सान पार्टीने (व्हीआयपी)  उत्तर प्रदेशमध्ये निवडणूक लढण्याचे जाहीर केले आहे. राष्ट्रीय जनता दलानेही (राजद) उत्तर प्रदेशमध्ये भाजपला पराभूत करण्याचा विडा उचलला आहे.राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील (रालोआ) घटक पक्ष उत्तर प्रदेशमध्ये एक-दुसऱ्यापासून वेगवेगळ्या मार्गांवर दिसत आहेत. बिहारमध्ये रालोआच्या भाजप व जदयू या दोन महत्त्वाच्या घटक पक्षांतील बोलणी अजून संपलेली नाही, तरीही दोघांमधील दबावाचे राजकारण कमी झालेले दिसत नाही. मुकेश सहनी यांचा व्हीआयपी तर उघडपणे भाजपविरोधात आहे. हिंदुस्तानी अवाम मोर्चादेखील (हम) स्वबळावर निवडणूक लढवणार आहे. उत्तर प्रदेशमध्ये जनता दलाने (संयुक्त) ५१ जागा लढवण्याचे ठरवले आहे. जदयूने ही इच्छा भाजपला आधीच सांगितली होती; परंतु अजून दोन्ही पक्षांत काही सूत्र ठरलेले नाही.जदयूचे राष्ट्रीय अध्यक्ष ललन सिंह म्हणाले की, जर भाजपने समझोत्याचा निर्णय लवकर नाही घेतला, तर जदयूचे उत्तर प्रदेश अध्यक्ष उमेदवारांची यादी जाहीर करतील. तसे झाले तर याचा परिणाम बिहारमध्ये होऊ शकतो व बिहारमधील राजकारण वेगळे वळण घेईल.उत्तर प्रदेश- अधिकाऱ्यावर आरोपगोंडाचे जिल्हादंडाधिकारी मार्कंडेय साहनी हे भाजपच्या हिताचे काम करीत असल्याचा आरोप निवडणूक आयोगाकडे समाजवादी पक्षाने गुरुवारी केला.