शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

Assembly Election 2022: मिनी लाेकसभेचे बिगुल वाजले; उत्तर प्रदेशसह पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकीचा धुरळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2022 06:25 IST

Assembly Election 2022: राजकारणातील गुन्हेगारीवर नियंत्रण राखण्यासाठी कडक उपाययाेजना करण्यावर मुख्य निवडणूक आयुक्तांनी भर दिला आहे. सुशीलचंद्र यांनी पत्रकार परिषद घेऊन या राज्यांमधील निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला.

- सुरेश भुसारीलाेकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : देशामध्ये कोरोनाची तिसरी लाट आलेली असताना पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होतील की नाही या शंकेला केंद्रीय निवडणूक आयोगाने शनिवारी पूर्णविराम दिला. उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, मणिपूर, गोवा या राज्यांमध्ये सात टप्प्यांमध्ये निवडणुका घेण्याचे आयोगाने जाहीर केले. १० फेब्रुवारी ते ७ मार्च या कालावधीत मतदानाची प्रक्रिया पूर्ण हाेईल व मतमाेजणी १० मार्चला हाेईल. राजकारणातील गुन्हेगारीवर नियंत्रण राखण्यासाठी कडक उपाययाेजना करण्यावर मुख्य निवडणूक आयुक्तांनी भर दिला आहे.

मुख्य निवडणूक आयुक्त सुशीलचंद्र यांनी पत्रकार परिषद घेऊन या राज्यांमधील निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. उत्तर प्रदेशात सात टप्प्यात तर पंजाब, उत्तराखंड व गाेवा या राज्यांमधील मतदान एकाच टप्प्यात पूर्ण हाेईल. मणिपूरमध्ये दोन  टप्प्यात मतदान हाेईल. पहिला टप्पा येत्या १० फेब्रुवारी, दुसरा १४ फेब्रुवारी, तिसरा १८ फेब्रुवारी, चाैथा २३ फेब्रुवारी, पाचवा २७ फेब्रुवारी, सहावा ३ मार्च तर सातवा ७ मार्चला संपणार आहे.

सुविधा ॲपलाेकांना तक्रार करण्यासाठी किंवा मतदारांना आमिष दाखविण्याचे प्रयत्न झाले तर त्याचे व्हिडीओ अपलाेड करण्यासाठी निवडणूक आयाेगाने सुविधा ॲप सुरू केले आहे. यावर काेणताही नागरिक तक्रार किंवा व्हिडीओ अपलाेड करू शकणार आहे.

काेराेना काळात मतदान एक आव्हानमुख्य निवडणूक आयुक्त सुशीलचंद्र म्हणाले की, काेराेनाच्या पार्श्वभूमीवर हाेणाऱ्या या राज्यांमध्ये मतदान प्रक्रिया राबविणे हे एक आव्हान आहे.  या साथीच्या काळात हाेत असलेल्या मतदान प्रक्रियेत मतदार, मतदान केंद्र व मतदान प्रक्रिया पूर्ण करणारे कर्मचारी पूर्णपणे सुरक्षित राहील, यावर आमचा भर राहणार आहे.  मतदान प्रक्रियेतील सर्व कर्मचाऱ्यांना दुसरा डाेस दिला आहे, याची खात्री करण्यात येईल. मतदान केंद्रांवरसुद्धा सर्वांनी शारीरिक अंतर राखण्याची व सॅनिटायझेशनची व्यवस्था केली जाणार आहे.निवडणूक खर्चात वाढउमेदवारांच्या खर्चातसुद्धा वाढ केली आहे. आधी २८ लाख रुपये असलेली खर्चाची मर्यादा आता ४० लाख इतकी केली आहे. ही मर्यादा उत्तर प्रदेश, पंजाब व उत्तराखंड या राज्यांना लागू असेल. गाेवा, मणिपूरमध्ये २८ लाख हीच मर्यादा कायम राहील.

महिलांकडे केंद्रांची जबाबदारीमहिला सबलीकरणासाठी महत्त्वाचे पाऊल म्हणून पाच राज्यांमधील १६२० मतदान केंद्रांवर केवळ महिला मतदान अधिकारी व सुरक्षा कर्मचारी असणार आहेत.

मतदान केंद्रांमध्ये वाढकाेराेनामुळे कमीत कमी मतदार एका केंद्रावर राहावे, या उद्देशाने या पाच राज्यांमध्ये २० हजार मतदान केंद्रांची भर टाकली आहे. यामुळे एका मतदान केंद्रांवर १ हजारपेक्षा अधिक मतदार राहणार नाही याची काळजी आयाेगाने घेतली आहे. 

खोट्या बातम्या व प्रक्षाेभक भाषणांवर कारवाईगेल्या काही दिवसांपासून दाेन समाजात दुही निर्माण होण्यासाठी प्रक्षाेभक भाषणे करण्याच्या घटना घडल्या आहेत. असे प्रकार करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा मुख्य निवडणूक आयुक्त सुशीलचंद्र यांनी दिला. 

दाेन समाजात दुही निर्माण करणे व किंवा खाेट्या बातम्या देऊन एखाद्याची प्रतिमा  मलिन करण्याचा प्रयत्न खपवून घेतला जाणार नाही असेही ते म्हणाले. 

१८ काेटी। मतदारपाच राज्यांमध्ये एकूण १८ काेटी ३४ लाख मतदार मतदानाचा अधिकार बजावणार आहेत. यात ८ काेटी ५५ लाख महिला आहेत.

१० फेब्रुवारी ते ७ मार्च दरम्यान मतदानाची प्रक्रिया पूर्ण होणार काेराेनामुळे १५ जानेवारीपर्यंत निवडणूक रॅली व पदयात्रांवर निर्बंधगाेवा, पंजाब व उत्तराखंडमध्ये एकाच टप्प्यात निवडणूकउत्तर प्रदेशमध्ये सात तर मणिपूरमध्ये दाेन टप्प्यात मतदान

टॅग्स :Goa Assembly Election 2022गोवा विधानसभा निवडणूक २०२२Uttar Pradesh Assembly Election 2022उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक २०२२Punjab Assembly Election 2022पंजाब विधानसभा निवडणूक २०२२