शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

Assam NRC Draft: सोनिया गांधींनी अवैध बांगलादेशींना केली होती मदत; विकिलीक्सचा खळबळजनक दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2018 18:03 IST

गेल्या काही दिवसांपूर्वी बलाढ्य राष्ट्रांची गुपिते उघड करणारा विकिलीक्स पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

नवी दिल्ली- गेल्या काही दिवसांपूर्वी बलाढ्य राष्ट्रांची गुपिते उघड करणारा विकिलीक्स पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. आता विकिलीक्सनं भारतातल्या राष्ट्रीय नागरिकत्व नोंदयादीच्या मुद्द्यावर धक्कादायक खुलासे केले आहेत. 16 फेब्रुवारी 2006ला अमेरिकी कॉन्स्युलेटचे अधिकारी केबल यांनी विकिलीक्सला पाठवलेल्या माहितीतून हा गौप्यस्फोट झाला आहे.2006च्या आसाम विधानसभा निवडणुकीदरम्यान सोनिया गांधींनी अवैधरीत्या भारतात राहणा-या मुस्लिमांचा बचाव केला होता. परराष्ट्र कायद्यात दुरुस्ती करणार असल्याचंही त्यावेळी सोनिया गांधींनी जाहीर केलं होतं. जेणेकरून  मुस्लीस शरणार्थी कायमचे भारतात राहू शकतील. परंतु 2005मध्ये सर्वोच्च न्यायालयानं आयएमडीटी कायद्याला असंवैधानिक घोषित केलं होतं. खरं तर या कायद्यामुळे बाहेरून आलेल्या बांगलादेशींची ओळख पटवून त्यांना परत पाठवणं अवघड झालं आहे. काँग्रेसनं नेहमीच बाहेरून आलेल्या बांगलादेशी शरणार्थींचं समर्थन केलं आहे. या आयएमडीटी कायद्यामुळेच 1971नंतर बांगलादेशींना भारतात आश्रय मिळत राहिला आहे.केबल म्हणाले, काँग्रेसनं कायमच मुस्लिम मतांचं ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न केला आहे. सोनिया गांधींनी या कायद्यात दुरुस्ती करण्याचा प्रयत्नही केला होता. आसाममध्ये काँग्रेस पक्षाचे 13 आमदार मुस्लिम आहेत. काँग्रेस पक्ष वारंवार मुस्लीम शरणार्थींचा बचाव करत आला आहे. त्यामुळे मुस्लिमांचा कल नेहमीच काँग्रेसकडे असतो. आसाममधल्या काँग्रेस पक्षाचे माजी खासदार किरीप चलिहा म्हणाले, माझ्या लक्षात नाही सोनिया गांधी त्यावेळी काय बोलल्या होत्या. परंतु मी कधीही बाहेरून आलेल्या शरणार्थींचं समर्थन केलेलं नाही. हा मुद्दा हिंदू आणि मुस्लिमांचा नव्हे, तर शरणार्थींचा आहे. शरणार्थींमुळे देशाच्या सुरक्षेसाठी धोका निर्माण होऊ शकतो, असंही ते म्हणाले आहेत. एकंदरीतच काँग्रेसनं केबल यांच्या आरोपावरून हात झटकले आहेत.  

टॅग्स :National Register of Citizensराष्ट्रीय नागरिकत्व नोंदयादीSonia Gandhiसोनिया गांधी