शहरं
Join us  
Trending Stories
1
उज्ज्वल निकम यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार? भाजपा नेते म्हणतात, “काही अशक्य नाही”
2
हिमाचलमधील एका तरुणीनं दोन भावांसोबत का केलं लग्न? जाणून घ्या काय आहे ही 'जोडीदार प्रथा'?
3
"मी रमी खेळतच नव्हतो...!" व्हायरल व्हिडीओवर कोकाटेंचं स्पष्टिकरण, पण स्वतःच मांडल्या दोन थेअरी; एकदा म्हणाले जाहिरात, एकदा म्हणाले...!
4
Madha Crime: चेहरा छिन्नविच्छिन्न, रस्त्यावर रक्ताचे डाग! यात्रेत गेलेल्या १० वर्षांच्या कार्तिकचा कालव्यात सापडला कुजलेला मृतदेह
5
विकृतीचा कळस! लंडनमधील इस्कॉनच्या रेस्टोरंटमध्ये घुसून मुद्दाम खाल्लं चिकन; घाणेरडं कृत्य पाहून लोक संतापले
6
मराठमोळी मृणाल ठाकूर घटस्फोटीत अभिनेत्याच्या प्रेमात? "सीतारामम" चित्रपटात एकत्र केलंं काम
7
चातुर्मासातील पहिली कामिका एकादशी: श्रीविष्णूंचे ‘या’ स्वरुपात करा पूजन; पाहा, सोपा व्रतविधी
8
“शिवसेना-ठाकरे ब्रँड तुमचे राहिलेले नाही, काँग्रेस बरोबर गेलात तेव्हाच संपला”; भाजपाची टीका
9
कुत्रा चावलाच नाही, तरीही अख्ख्या गावाने घेतले रेबीजचे इंजेक्शन, छत्रपती संभाजीनगरमधील प्रकार
10
DCM एकनाथ शिंदेंचे नाव सुवर्ण अक्षरांनी लिहिणार; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची घोषणा
11
MRI मशीनने व्यक्तीला एका झटक्यात गिळले, तडफडून मृत्यू, एक छोटीशी चूक ठरली जीवघेणी  
12
“CM फडणवीसांना टोमणा नाही, मित्र म्हणून सल्ला देतो की...”; नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे?
13
राज ठाकरे-निशिकांत दुबे वादावर स्वामी अविमुक्तेश्वरानंदांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
14
विरोधकांच्या मागणीला यश; पावसाळी अधिवेशनात 'ऑपरेशन सिंदूर'वर चर्चेस सरकार तयार
15
तुमच्या कराचा पैसा जातोय कुठे? GST मध्ये १५ हजार कोटींचा महाघोटाळा, वाचा काय आहे हे प्रकरण!
16
Beed: प्रेयसीने घरी बोलावलं, तो गेला अन् नातेवाईकांनी पकडले; तीन दिवसांतच तरुणाचा घेतला जीव
17
Shirish Valsangkar: वळसंगकर रुग्णालयासह 'त्या' चारही डॉक्टरांची बँक खाती तपासा, मनीषा मानेचं पोलिसांना पत्र
18
"विमान टेकऑफ होण्यापूर्वी तरुण म्हणाला माझ्या खिशात बॉम्ब"; प्रवाशांना फुटला घाम, प्रचंड गोंधळ
19
'हा' माणूस फक्त कुत्र्यांना फिरवून महिन्याला कमावतोय ४.५ लाख रुपये, बिझनेस आयडिया व्हायरल!
20
पाकिस्तानात लष्करी सराव की पुन्हा सतावतेय भारताकडून एअरस्ट्राइक होण्याची भीती? घेतला मोठा निर्णय 

आसामात २०० जणांसह बोट बुडाली, ३० बेपत्ता

By admin | Updated: September 28, 2015 23:41 IST

आसामच्या कामरूप जिल्ह्णाच्या कोलोही नदीत सोमवारी सुमारे २०० प्रवाशांनी खचाखच भरलेली एक यांत्रिक बोट बुडाल्यानंतर ३० जण बेपत्ता आहेत.

चाईगाव (आसाम) : आसामच्या कामरूप जिल्ह्णाच्या कोलोही नदीत सोमवारी सुमारे २०० प्रवाशांनी खचाखच भरलेली एक यांत्रिक बोट बुडाल्यानंतर ३० जण बेपत्ता आहेत.कामरूप (ग्रामीण)चे उपायुक्त विनोदकुमार शेषन यांनी ही माहिती दिली. होड्यांच्या शर्यतीत सामील होणाऱ्या लोकांना घेऊन ही बोट चाईगाववरून चम्पुपाडाकडे निघाली होती. बोटीत क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी होते. दुथडी भरून वाहणाऱ्या नदीपात्राच्या मधोमध पोहोचताच तिच्या इंजिनने अचानक काम करणे बंद केले आणि ती पुलाच्या खांबाला धडकली. खांबाला धडकताच बोट उलटली आणि प्रवासी नदीत पडले. स्थानिक गावकऱ्यांनी तात्काळ बचाव व मदत कार्य सुरू केले. एनडीआरएफ व एसडीआरएफचे कर्मचारीही घटनास्थळी पोहोचले. अनेक लोकांनी पोहत आपला जीव वाचवला. मात्र बोटीतील ३० जण अद्याप बेपत्ता आहे. त्यांचा शोध सुरू आहे. बोटीत क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी असल्यामुळे दुर्घटना घडण्याच्या घटना अनेकदा घडल्या आहेत. मात्र आसामसह देशाच्या इतर भागातील जलमार्गात आजही नावांमध्ये क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी बसवून बिनबोभाट वाहतूक सुरू आहे. प्रवाशांना जलसमाधी मिळाल्याची दुर्घटना घडल्यानंतर प्रशासन जागे होते व तात्पुरती उपाययोजना घोषित होतात. मात्र काही दिवसांनी जुनाच कित्ता सुरू होतो. (वृत्तसंस्था)