शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

Aryan Khan Drugs : समीर वानखेडेंबद्दल चांगलंच ऐकलंय, अंजली दमानियांचा नवाब मलिकांवर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2021 15:40 IST

मी वानखेडे यांना कधीच भेटले नाही, पण त्यांच्याबद्दल बऱ्याच सरकारी अधिकारी आणि पत्रकारांकडून ऐकलं आहे

ठळक मुद्देआजही मलिकांनी समीर वानखेडे भाजपचे पोपट असून, भाजपचा जीव त्या पोपटात अडकलाय, असा टोला लगावला. मलिकांच्या या टोल्याला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस(Dvendra Fadnavis) प्रत्युत्तर दिलं आहे.

नवी दिल्ली - राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री नवाब मलिक आणि एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्यात चांगलाच कलगीतुरा रंगला आहे. आर्यन खानला ड्रग्ज प्रकरणात अटक केल्यानंतर नवाब मलिक यांनी समीर वानखेडेंवर गंभीर आरोप केले आहेत. तसेच, वानखेडे यांनी खोट्या कागदपत्रांच्या आधारे नोकरी मिळवली असून त्यांच्या वडिलांचे नाव दाऊद असल्याचं त्यांनी म्हटलंय. त्यानंतर, भाजप नेते समीर वानखेडेंच्या समर्थनार्थ उतरले आहेत. आता, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनीही वानखेडेंचे समर्थन केलं आहे. 

मी वानखेडे यांना कधीच भेटले नाही, पण त्यांच्याबद्दल बऱ्याच सरकारी अधिकारी आणि पत्रकारांकडून ऐकलं आहे. नवाब मलिक यांच्यासारख्या माणसांनी त्यांच्याविरोधात जे बदनामीसत्र चालवलंय ते एकदम चीड आणणारं आहे, असे दामानिया म्हणाल्या. तसेच, वानखेडे यांचं काम सरळ आणि स्पष्ट असल्यांच ऐकलंय. मलिक यांच्याकडून वानखेडे यांची प्रतिमा आणि विश्वासर्हता कमी करण्याचा खटाटोप सुरुय. त्यामुळे, समीर वानखेडे यांच्या बाजूनं सर्व सहकारी आणि अधिकाऱ्यांनी उभं राहायला हवं. आज जर त्यांच्यासोबत कुणी उभं राहिलं नाही तर तुम्हीदेखील तुमचं कर्तव्य व्यवस्थित पाडू शकणार नाहीत,” असे स्पष्ट मत दमानिया यांनी व्यक्त केलं.

दरम्यान, आजही मलिकांनी समीर वानखेडे भाजपचे पोपट असून, भाजपचा जीव त्या पोपटात अडकलाय, असा टोला लगावला. मलिकांच्या या टोल्याला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस(Dvendra Fadnavis) प्रत्युत्तर दिलं आहे. फडणवीस यांनी आज मीडियाशी संवाद साधला. त्यावेळी, राष्ट्रवादीचा पोपट रोज बोलतोय ना? असा चिमटा काढला. तसेच, कोण कोणाचा पोपट आहे, हे तुमच्यासाठी महत्त्वाचे असेल, आमच्यासाठी नाही, असंही फडणवीस म्हणाले. 

टॅग्स :anjali damaniaअंजली दमानियाSameer Wankhedeसमीर वानखेडेnawab malikनवाब मलिक