शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

'माझ्याकडून चूक झाली...' ध्रुव राठीचा व्हिडीओ रिट्विट केल्याबाबत सीएम केजरीवाल यांनी माफी मागितली

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2024 17:36 IST

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सुप्रीम कोर्टात ध्रुव राठी यांचा व्हिडीओ रिट्विट केल्या प्रकरणी माफी मागितली आहे.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सुप्रीम कोर्टात ध्रुव राठी यांचा व्हिडीओ रिट्विट केल्या प्रकरणी माफी मागितली आहे.  मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या वकीलांनी सुप्रीम कोर्टात कबूल केले की यूट्यूबर ध्रुव राठी यांनी भाजप आयटी सेलबाबत शेअर केलेला व्हिडीओ रिट्विट करणे ही त्यांची चूक होती. यापूर्वी, दिल्ली उच्च न्यायालयाने हाच व्हिडीओ रिट्विट केल्याबद्दल दाखल केलेल्या फौजदारी मानहानीच्या प्रकरणात जारी केलेले समन्स कायम ठेवले होते. उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देण्यासाठी अरविंद केजरीवाल यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. सुप्रीम कोर्टात झालेल्या सुनावणीदरम्यान केजरीवाल यांच्या वकिलांनी चूक मान्य केल्यावर कोर्टाने कनिष्ठ न्यायालयाच्या कारवाईवर तात्पुरती स्थगिती दिली.

सिंहाचे 'अकबर' अन् सिंहिणीचे 'सीता' नाव ठेवणाऱ्या वनाधिकारीचे निलंबन! त्रिपुरा सरकारचा निर्णय

सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती संजीव खन्ना आणि न्यायमूर्ती दीपंकर दत्ता यांच्या खंडपीठाने तक्रारदार विकास सांकृत्यायन यांना विचारले की, दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी माफी मागितल्यास केस मागे घेणार का? सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने कनिष्ठ न्यायालयाला केजरीवाल यांच्याशी संबंधित मानहानीच्या खटल्याची सुनावणी ११ मार्चपर्यंत पुढे ढकलण्याचे निर्देश दिले. सीएम केजरीवाल यांचे प्रतिनिधित्व करणारे ज्येष्ठ वकील अभिषेक मनू सिंघवी यांनी व्हिडीओ रिट्विट करताना अरविंद केजरीवाल यांची चूक मान्य केली.

दिल्ली उच्च न्यायालयाने ५ फेब्रुवारीच्या निर्णयात म्हटले होते की, कथित बदनामीकारक व्हिडीओ शेअर करणे हे मानहानी कायद्याचे उल्लंघन मानले जाईल. संपूर्ण माहितीशिवाय व्हिडीओ रिट्विट करणे म्हणजे काय हे समजून घ्यावे लागेल, असे न्यायालयाने स्पष्टपणे सांगितले. बदनामीकारक मजकूर रिट्विट केल्यास कायदेशीर कारवाई होऊ शकते, असंही यात म्हटले आहे.

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालdelhiदिल्ली