शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
3
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
5
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
6
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
7
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
8
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
9
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
10
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
11
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
12
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
13
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
14
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
15
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
16
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
17
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
18
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
19
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
20
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं

'आप' बनला राष्ट्रीय पक्ष; जाणून घ्या, राष्ट्रीय पक्षाचा दर्जा कसा मिळतो आणि काय आहेत नियम?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2022 19:34 IST

National Party AAP : आम आदमी पार्टी हा देशातील आठवा राष्ट्रीय पक्ष ठरला आहे. यापूर्वी देशात सात राष्ट्रीय पक्ष होते. त्यामध्ये काँग्रेस, भाजप, बसपा, सीपीआय, सीपीएम, एनसीपी आणि टीएमसीची नावे होती.

नवी दिल्ली : आम आदमी पार्टी (AAP) आज राष्ट्रीय पक्ष बनला (National Party) आहे. यासंदर्भात आम आदमी पार्टीचे प्रमुख आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी माहिती दिली आहे. गुजरातच्या जनतेने आम आदमी पार्टीला राष्ट्रीय पक्ष  बनवले आहे, असे अरविंद केजरीवाल म्हणाले.  

गुजरातमध्ये पार्टीला मिळालेल्या मतांच्या संख्येनुसार आम आदमी पार्टी आता राष्ट्रीय पक्ष बनला आहे. अवघ्या 10 वर्षात आम आदमी पार्टी देशातील काही राष्ट्रीय पक्षांमध्ये सामील झाला आहे. गुजरातमधील लोकांचे आभार व्यक्त करताना अरविंद केजरीवाल म्हणाले की, "ज्यावेळी मी गुजरातमध्ये गेलो, तेव्हा मला खूप प्रेम मिळाले. मी तुम्हा सर्वांचा ऋणी राहीन. गुजरात हा भाजपचा बालेकिल्ला मानला जातो. तो फोडण्यात आम्ही यशस्वी झालो. गुजरातमध्ये आम्हाला 13 टक्के मते मिळाली आहेत." 

याचबरोबर, अरविंद केजरीवाल म्हणाले, "गुजरातच्या लाखो लोकांनी आम्हाला मतदान केले आहे. आम्ही संपूर्ण मोहीम सकारात्मक पद्धतीने चालवली. कोणाला शिवीगाळ केली नाही. फक्त कामाबद्दल बोललो. हेच आम्हाला इतर पक्षांपेक्षा वेगळे ठरवते. आजवर बाकीचे पक्ष धर्म आणि जातीचे राजकारण करत आले आहेत. पक्ष कामावर बोलण्याची ही पहिलीच वेळ आहे."

देशात किती राष्ट्रीय पक्ष आहेत?आम आदमी पार्टी हा देशातील आठवा राष्ट्रीय पक्ष ठरला आहे. यापूर्वी देशात सात राष्ट्रीय पक्ष होते. त्यामध्ये काँग्रेस, भाजप, बसपा, सीपीआय, सीपीएम, एनसीपी आणि टीएमसीची नावे होती. देशात राष्ट्रीय पक्षांव्यतिरिक्त राज्यस्तरीय पक्ष आणि प्रादेशिक पातळीवरील पक्ष आहेत. प्रत्येकाचे प्रमाणही वेगळे असते.

राष्ट्रीय पक्षाचा दर्जा कसा मिळतो?कोणत्याही राजकीय पक्षाला राष्ट्रीय पक्ष होण्यासाठी अनेक मानके पूर्ण करावी लागतात. मात्र, कोणत्याही पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळण्याचे दोन मार्ग आहेत. एक म्हणजे एखाद्या पक्षाचे लोकसभेत 4 सदस्य असतील आणि लोकसभा निवडणुकीत त्याला 6 टक्के मते मिळाली तर त्याला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळतो. दुसरीकडे, दुसरा मार्ग म्हणजे 4 राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत 6 टक्क्यांहून अधिक मते मिळाली पाहिजेत .

आम आदमी पार्टीला कुठे आणि किती मते?राष्ट्रीय पक्ष बनलेल्या आम आदमी पार्टीचे दिल्ली, पंजाब आणि दिल्ली एमसीडीमध्ये सरकार आहे. त्याचबरोबर. आम आदमी पार्टीचे गोव्यात सुद्धा दोन आमदार आहेत. गोवा विधानसभा निवडणुकीत आम आदमी पार्टीने दोन जागा जिंकल्या आणि त्यांना 6.77 टक्के मते मिळाली. आता गुजरातमध्येही आम आदमी पार्टीला जवळपास 13 टक्के मते मिळाली आहेत. अशाप्रकारे, चार राज्यांमध्ये आम आदमी पार्टीचे 6 टक्क्यांहून अधिक मते झाली आहेत. त्यामुळे आम आदमी पार्टी 8 वा राष्ट्रीय पक्ष बनला आहे.

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालAAPआप