शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

Delhi Election Results : केजरीवाल देणार पत्नी सुनिता यांना वाढदिवसाची 'विजयी भेट'

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2020 11:42 IST

दिल्ली निवडणूक निकालांमध्ये आपचा विजय झाल्यास दिल्लीमध्ये सलग तिसऱ्यांदा केजरीवाल याचं सरकार बनणार आहे.

नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणुकीचे निकाल जनतेसमोर येण्यास सुरुवात झाली आहे, तर काही तासात निकाल हाती येणार आहे. त्यामुळे दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. निकालातील आकडे पाहता पुन्हा दिल्लीत केजरीवाल सरकार स्थापन होणार असल्याचे बोलले जात आहे. तर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासाठी आजचा हा दिवस खास असणार आहे. कारण आजच्या दिवशीच त्यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल यांचा वाढदिवस असून, मुख्यमंत्री त्यांच्या पत्नीला विजयाची भेट देणार असल्याचे बोलले जात आहे.

सुनीता केजरीवाल यांच्या वाढदिवसात आम आदमी पक्षाच्या संभाव्य विजयाने आनंदाची भर घातली आहे. तर आपचे कार्यकर्ते आणि नेते अरविंद केजरीवाल यांच्या घरी जमा होत असून, त्यांना मुख्यमंत्री पदाच्या तर त्यांच्या पत्नीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना दिसत आहे. त्यामुळे केजरीवाल कुटुंबात दुहेरी उत्सव पाहायला मिळत आहे.

दिल्ली निवडणूक निकालांमध्ये आपचा विजय झाल्यास दिल्लीमध्ये सलग तिसऱ्यांदा केजरीवाल याचं सरकार बनणार आहे. दिल्लीकरांसाठी 5 वर्षे कामं केल्यामुळे आपचा विजय निश्चित असल्याचं मनीष सिसोदिया यांनी म्हटलं आहे. 'दिल्लीत विजय होणार याबाबत आम्हाला आत्मविश्वास आहे. कारण गेल्या पाच वर्षात आम्ही इथल्या लोकांसाठी काम केली आहेत' असं त्यांनी म्हटलं आहे.