शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

Arvind Kejriwal: "आम्ही नवा भारत घडवू, ज्यात विद्यार्थ्यांना युक्रेनला जावं लागणार नाही"; अरविंद केजरीवालांचं विधान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2022 16:51 IST

Punjab Assembly 2022: पंजाब विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाला मिळालेल्या अभूतपूर्व यशानंतर पक्षाचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांनी पंजाबच्या जनतेचे आभार व्यक्त करताना मोठं विधान केलं आहे.

Punjab Assembly 2022: पंजाब विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाला मिळालेल्या अभूतपूर्व यशानंतर पक्षाचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांनी पंजाबच्या जनतेचे आभार व्यक्त करताना मोठं विधान केलं आहे. पंजाबमध्ये आपनं बहुमताचा आकडा गाठला असून ११७ जागांपैकी तब्बल ९२ जागांवर आपचे उमेदवार आघाडीवर आहेत. पंजाब काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांना या निवडणूकीत पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. दिल्लीस्थित आम आदमी पक्षाचा कार्यालयातून संबोधित करताना केजरीवालांनी पंजाबच्या जनतेनं आज कमाल करुन दाखवल्याचं म्हटलं. 

"पंजाबच्या जनतेनं आज कमाल केली आहे. आम्ही देशाची प्रस्थापित व्यवस्था बदलण्याचं काम केलं आहे. आता आम्हा नवा भारत घडवू ज्यात विद्यार्थ्यांना युक्रेनला जाण्याची गरज भासणार नाही. पंजाबमध्ये काँग्रेसच्या दिग्गजांना आज सर्वसामान्य जनतेचं प्रतिनिधीत्व करणाऱ्या आपच्या उमेदवारांनी पराभूत केलं आहे. मुख्यमंत्री चरणजीतसिंग चन्नी यांना तर एका मोबाइल रिपेअर करणाऱ्यानं पराभूत केलं. ज्याची आई एका शाळेत साफसफाईचं काम करते. हा एका सर्वसामान्य महिलेचा विजय आहे. पंजाबच्या निकालांनी जनतेनं दाखवून दिलंय की केजरीवाल दहशतवादी नव्हे, तर एक देशभक्त आहे", असं केजरीवाल म्हणाले. 

खुर्च्या जागेवर राहणार नाहीत- केजरीवाल"आम्ही इमानदारीचं राजकारण सुरू केलं आहे. लोकांचं काम करणारा आमचा पक्ष आहे. आम्हाला रोखणं आता इतकं सोपं राहिलेलं नाही. पंजाबमध्ये खूप मोठमोठी षडयंत्र रचली गेली. सर्वजण आपच्या विरुद्ध एकत्र झाले होते. अखेरीस केजरीवाल दहशतवादी असल्याचं ते बोलू लागले. पण मी आजही सांगतो आम आदमीला आव्हान देऊ नका. एक सर्वसामान्य माणूस सत्ताधाऱ्यांची खूर्ची हिसकावून घेण्याचं काम करू शकतो", असं केजरीवाल म्हणाले.