शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

"आघाडी नाही, स्वबळावर निवडणूक लढवणार", दिल्ली विधानसभा निवडणुकीबाबत 'आप'ची मोठी घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2024 13:59 IST

Arvind Kejriwal : आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी आगामी विधानसभा निवडणुकीसंदर्भात मोठे वक्तव्य केले आहे. 

Delhi Assembly Elections नवी दिल्ली : नुकत्याच झारखंड आणि महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या. यानंतर आता आगामी दिल्ली विधानसभा निवडणुकीची तयारी सुरु झाली आहे. आगामी दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्ष कामाला लागले आहेत. दिल्लीतील सत्ताधारी आम आदमी पक्षानेही(आप) जोरदार तयारी केली आहे. अशातच आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी आगामी विधानसभा निवडणुकीसंदर्भात मोठे वक्तव्य केले आहे. 

आम्ही कोणतीही आघाडी करणार नाही. दिल्लीतील सर्व जागांवर आप स्वबळावर निवडणूक लढवणार आहे, असे दिल्ली विधानसभा निवडणुकीतील आघाडीबाबत अरविंद केजरीवाल यांनी म्हटले आहे. याचबरोबर, अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीतील सर्व विधानसभा मतदारसंघात परिवर्तन यात्रा काढण्याच्या भाजपच्या निर्णयावरही भाष्य केले. ते म्हणाले, "भाजपला परिवर्तन यात्रा काढू द्या. लोकशाहीत प्रत्येकाला तसे करण्याचा अधिकार आहे. लोकशाहीत कोणीही काहीही काढू शकतो."

दरम्यान, फेब्रुवारी २०२५ मध्ये दिल्लीत विधानसभेच्या एकूण ७० जागांवर निवडणुका होणार आहेत. या निवडणुकीत चौथ्यांदा दिल्लीत सत्तेवर येण्यासाठी आप जोरदार प्रयत्न करत आहे. दुसरीकडे, भाजप आणि काँग्रेसचे नेतेही आपच्या विरोधात आक्रमक असून निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. २०२० च्या विधानसभा निवडणुकीत ७० पैकी ६२ जागा जिंकल्या होत्या. तर आठ जागांवर भाजपचे उमेदवार विजयी झाले.

तक्रार करणाऱ्यालाच अटक केली - केजरीवालयाआधी आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल म्हणाले होते की, उत्तम नगरमधील आमचे आमदार नरेश बाल्यान यांना ३० नोव्हेंबरला अटक करण्यात आली. ते गँगस्टरच्या विरोधात सातत्याने तक्रारी करत होते. आता त्यांच्या मुलाला टार्गेट करण्यात आले आहे. लोकांकडून पैसे घ्या आणि आपल्याला द्या, असे गँगस्टर कपिल सांगवानच्या वतीने सांगण्यात आले होते. या धमकीची तक्रार नरेश बाल्यान यांनी दिल्ली पोलिसांकडे केली होती. त्यांच्या तक्रारीवर कारवाई करण्याऐवजी दिल्ली पोलिसांनी नरेश बाल्यान यांनाच अटक केली.

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालdelhiदिल्लीAAPआपAam Admi partyआम आदमी पार्टी