शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

केजरीवाल 20 दिवसांपासून अटकेत; उच्च न्यायालयाच्या झटक्यानंतर, आता जामिनासाठी केवळ दोन पर्याय!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2024 19:41 IST

अटकेनंतर अरविंद केजरीवालांची ईडी रिमांड अवैध ठरवली जाऊ शकत नाही. तसेच, ईडीकडून अरविंद केजरीवालांची अटक कायद्यातील तरतुदींचे उल्लंघन नाही, असेन उच्च न्यायालयाने म्हटले आहे.

दिल्ली मद्य घोटाळा प्रकरणी मुख्यमत्री अरविंद केजरीवाल यांना उच्च न्यायालयाकडून मोठा झटका बसला आहे. मद्य घोटाळ्यातील मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात झालेल्या अटकेविरोधातील अरविंद केजरीवाल यांची याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. महत्वाचे म्हणजे, उच्च न्यायालयाने निर्णय देताना अनेक बाबींवर भाष्य केले आहे. अटकेनंतर अरविंद केजरीवालांची ईडी रिमांड अवैध ठरवली जाऊ शकत नाही. तसेच, ईडीकडून अरविंद केजरीवालांची अटक कायद्यातील तरतुदींचे उल्लंघन नाही, असेन उच्च न्यायालयाने म्हटले आहे.

केजरीवालांकडे आहे हे दोन पर्याय - उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर आता मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याकडे दोन पर्याय उरतात. पहिला पर्याय म्हणजे, सर्वोच्च न्यायालयात जाणे आणि दिल्ली उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देणे. यानंतर, सर्वोच्च न्यायालय यावर सुनावणी करू शकते. तसेच दुसरा पर्याय म्हणजे, ते कनिष्ठ न्यायालयात जामिनासाठी जाऊ शकतात. यामुळे, आता केजरीवालांची टीम काय विचार करते, हे बघावे लागेल. कारण दिल्ली उच्च न्यायालयाने जमीन देण्यास स्पष्ट नकार दिला आहे. मात्र यातच, आपण सर्वोच्च न्यायालयात जाणार आहोत, असे आप नेते सौरभ भारद्वाज यांनी म्हटले आहे.

काय म्हणालं न्यायालय - न्या. स्वर्ण कांता शर्मा यांनी निर्णय सुनावताना म्हटलं की, हे प्रकरण केंद्र सरकार आणि केजरीवाल यांच्यातील नाही तर ईडी आणि केजरीवाल यांच्यात आहे. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी तपास यंत्रणांनी त्यांना अटक केली. ईडीकडे असणारे पुरावे पाहता ही अटक वैध आहे. कुणालाही विशेषाधिकार देऊ शकत नाही. तपासातील चौकशीपासून मुख्यमंत्री म्हणून कुठलीही सवलत दिली जाऊ शकत नाही. न्यायाधीश कायद्याने बांधलेले आहेत. राजकारणाशी नाही असंही कोर्टाने स्पष्ट केले. 

केजरीवालांच्या अटकेचा आज 20 वा दिवस -दरम्यान, निवडणूका डोळ्यासमोर ठेवून केजरीवालांना अटक करण्यात आली असं याचिकाकर्त्यांनी म्हटलं, त्यावरही न्यायालयाने फटकारले आहे. निवडणुका असल्यामुळे अटकेला आव्हान दिले जाऊ शकत नाही. अटकेची वेळ तपास यंत्रणा ठरवतात असे न्यायालयाने सांगितले. ईडीने 21 मार्च रोजी अरविंद केजरीवाल यांना अटक केली. त्यांच्यावर मनी लॉन्ड्रिंगचा आरोप आहे. केजरीवालांच्या अटकेचा आज 20 वा दिवस आहे. 

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालAam Admi partyआम आदमी पार्टीHigh Courtउच्च न्यायालयCourtन्यायालय