शहरं
Join us  
Trending Stories
1
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
2
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
3
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
4
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
5
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
6
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
7
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
8
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
9
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
10
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
11
शेअर असावा तर असा...! सरकारची एक घोषणा अन् थेट ₹4000 नं वाढला; एकाच दिवसात केली कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
12
Video: रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते..? 5 प्रवाशांना घेऊन Scorpio-N अख्खी बुडाली...
13
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7७ लाख कोटींची कमाई
14
कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न; नऊ प्रवासी ताब्यात, एअर इंडियाच्या विमानात नेमकं काय घडलं?
15
मराठवाड्यातील अतिवृष्टीचा एकनाथ शिंदेंनी घेतला आढावा; जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद
16
शेअर आहे की पैशांचं झाड...? या महारत्न कंपनीनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल, 1 लाखाचे केले थेट 25 लाख! 3 वेळा वाटले बोनस शेअर
17
पाकिस्तानात निसर्गाचा हाहाकार; मुसळधार पाऊस अन् पुरामुळे 1 हजारहून अधिक जणांचा मृत्यू
18
भारताविरोधात गन सेलिब्रेशन करणाऱ्या पाकिस्तानच्या फरहानचा माजोरडेपणा कायम, आता म्हणाला....
19
काँग्रेसचे नेते आणि हिमाचलमधील मंत्री विक्रमादित्य सिंह यांनी केलं दुसरं लग्न, कोण आहे त्यांची दुसरी पत्नी?
20
डीजेचा मोठा आवाज ठरेल जीवघेणा; हार्ट अटॅक, ब्रेन हॅमरेजचा धोका, फुटू शकते मेंदूची नस

अरविंद केजरीवाल यांना हायकोर्टाने दिला झटका

By admin | Updated: August 5, 2016 04:13 IST

नायब राज्यपाल हेच दिल्लीचे प्रशासकीय प्रमुख आहेत, असा निकाल देऊन दिल्ली उच्च न्यायालयाने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना त्यांची जागा दाखविली

नवी दिल्ली : राष्ट्रीय राजधानी परिक्षेत्राला स्वतंत्र प्रशासकीय दर्जा दिला असला तरी राज्यघटनेनुसार दिल्ली अजूनही केंद्रशासित प्रदेश असल्याने नायब राज्यपाल हेच दिल्लीचे प्रशासकीय प्रमुख आहेत, असा निकाल देऊन दिल्ली उच्च न्यायालयाने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना त्यांची जागा दाखविली.विधानसभा निवडणुकीत ७० पैकी ६७ जागा जिंकून सत्तेवर आल्यापासून आम आदमी पक्षाच्या दिल्लीतील केजरीवाल सरकारने केंद्र सरकारशी सातत्याने संघर्षाचा पवित्रा घेतला आहे. नायब राज्यपालांना हाताशी धरून केंद्र सरकार दिल्ली सरकारचे पंख कापू पाहात आहे, असा आरोप करणारे केजरीवाल उच्च न्यायालयाच्या या निकालाने पुरते चितपट झाले आहेत. साहजिकच या निकालानंतरही हार न मानता त्याविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात अपील करण्याचे ‘आप’ सरकारने जाहीर केले आहे.दिल्ली सरकार व केंद्र सरकार यांच्यात संघर्षाचे कारण ठरलेली एकूण नऊ प्रकरणे उच्च न्यायालयापुढे होती. दिल्ली प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या नेमणुका करण्याचे संपूर्ण अधिकार नायब राज्यपालांना देणारी केंद्र सरकारची २१ मे २०१५ ची अधिसूचना आणि दिल्ली सरकारच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे कार्यक्षेत्र फक्त दिल्ली सरकारच्या अधिकाऱ्यांपुरते मर्यादित करून केंद्राच्या सेवेतील अधिकाऱ्यांना त्यांच्या कक्षेतून वगळणारी २३ जुलै २०१४ ची अधिसूचना ही हा संघर्ष न्यायालयात येण्याची कारणे ठरली होती. दिल्ली सरकारने या दोन्ही अधिसूचनांच्या वैधतेस आव्हान दिले होते. मुख्य न्यायाधीश न्या. जी. रोहिणी यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने या दोन्ही अधिसूचना वैध असल्याचा निर्वाळा दिला.दिल्ली केंद्रशासित प्रदेश असल्याने नायब राज्यपाल दिल्लीचे प्रशासकीय प्रमुख आहेत आणि दिल्लीच्या मंत्रिमंडळाने दिलेला सल्ला त्यांच्यावर बंधनकारक नाही. तसेच नायब राज्यपालांना पूर्व सूचना दिल्याखेरीज आणि मतभेद असतील तर केंद्र सरकारचे मत घेतल्याखेरीज दिल्ली सरकार स्वत:च्या पातळीवर कोणताही निर्णय घेऊन त्याची परस्पर अंमलबजावणी करू शकत नाही, असा निर्वाळाही न्यायालयाने दिला.भारतीय राज्यघटनेचे अनुच्छेद २३९ व २३९एए तसेच राष्ट्रीय राजधानी क्षेत्र दिली सरकार कायदा यांचा समन्वित अर्थ लावला असता, दिल्ली आजही केंद्रशासित प्रदेशच असल्याचे स्पष्ट होते. त्यामुळे कायदा व सुव्यवस्था आणि दिल्ली विकास प्राधिकरण हे विषय दिल्ली सरकारच्या अधिकारकक्षेच्या बाहेरचे आहेत, असेही न्यायालयाने म्हटले. मात्र नायब राज्यपालांना विशेष पब्लिक प्रॉसिक्युटर नेमण्याचे अधिकार असले तरी ते हे अधिकार मंत्रिमंडळाच्या सल्लाविना वापरू शकत नाहीत, हे केजरीवाल सरकारचे म्हणणे न्यायालयाने मान्य केले. (लोकमत न्यूज नेटवर्क)>अनेक बेकायदा निर्णय रद्दनायब राज्यपालांना आधी न कळविता केजरीवाल सरकारने अनेक निर्णय न्यायालयाने बेकायदा ठरवून रद्द केले. त्यातील काही प्रमुख असे : सीएनजी वाहनांना फिटनेस दाखला देण्यातील कथित अनियमितता व दिल्ली व जिल्हा क्रिकेट संघटनेतील कथित वित्तीय गैरव्यवहारांच्या चौकशीसाठी दोन चौकशी आयोग नेमणे.अघोषित भारनियमन केल्यास त्याबद्दल ग्राहकांना भरपाई देण्याचा दिल्लीतील वीज पुरवठा कंपन्यांना दिलेला आदेश.दिल्लीतील वीज पुरवठा कंपन्यांवर केलेल्या सरकारी संचालकांच्या नियुक्त्या.